#या दिवशी क्रिकेट
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 2 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 25 November 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ नोव्हेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु झालं. लोकसभेत कामकाज सुरु होताच माजी खासदार वसंतराव चव्हाण, हरिश्चंद्र चव्हाण यांच्यासह सदनाच्या दिवंगत सदस्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
राज्यसभेतही कामकाज सुरु झाल्यावर दिवंगत सदस्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर अदानी ग्रूप विरोधात असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं.
दरम्यान, अधिवेशनापूर्वी संसद भवन परिसरात वार्ताहरांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, संसदेत चांगली चर्चा झाली पाहिजे, अधिकाधिक खासदार चर्चेत सहभागी झाले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. सदनात नवीन सदस्यांना बोलण्याची संधी मिळत नसल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. संसदेचं हे सत्र अनेक प्रकारे विशेष असून, संविधानाच्या ७५व्या वर्षात आपण पदार्पण करत असल्याचं पंतप्रधान म्��णाले. 
या अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयकासह १६ महत्त्वाची विधेयकं मांडण्याचं नियोजन आहे. वायूयान, आपत्ती व्यवस्थापन, रेल्वे, बंदरे आदी विधेयकांवरही या अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता आहे. हे अधिवेशन २० डिसेंबरपर्यंत चालणार असून, उद्या संविधान दिनानिमित्त सदनाचं कामकाज होणार नाही.
****
नवी दिल्लीत आयोजित आंतराष्ट्रीय सहकार संमेलनाचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त एका टपाल तिकीटाचं प्रकाशनही यावेळी होईल. गेल्या १३० वर्षांत प्रथमच आय सी ए अर्थात आंतरराष्ट्रीय सहकार आघाडीच्या बैठकीचं आणि संमेलनाचं आयोजन, भारतात होत आहे. या संमेलनात भारताच्या प्रतिनिधी म्हणून इफकोच्या संचालिका डॉ. वर्षा कस्तुरकर देखील सहभागी होणार आहेत. 
****
केंद्र सरकारचं महिला आणि बालविकास मंत्रालय, ग्रामीण विकास मंत्रालय यांच्यातर्फे, आजपासून अब कोई बहाना नही, या अभियानाचा प्रारंभ होत आहे. या अभियानात नागरीक, सरकार तसंच प्रमुख संबंधितांना लिंगाधारित हिंसा समूळ नष्ट करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन करण्यात येणार आहे. लिंगाधारित हिंसेला समाप्त करण्यासाठी नागरीकांमध्ये जागरुकता निर्माण करणं, हा या अभियानाचा उद्देश आहे. दरवर्षी २५ नोव्हेंबर हा दिवस जागतिक महिला हिंसा निर्मूलन दिवस म्हणून पाळण्यात येतो.
****
रेल्वे मध्ये कुठल्याही प्रकारे खाजगीकरण होणार नसल्याचं संसदेच्या पटलावर सांगितल्याचं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. नागपूर इथं आज अखिल भारतीय अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती रेल्वे कर्मचारी संघटनेच्यावतीने आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभा आणि राष्ट्रीय अधिवेशनाचं उद्घाटन आज वैष्णव यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. रेल्वेच्या सामान्य डब्याचं विशेष उत्पादन सुरु असून, त्याअंतर्गत साडे बारा हजार डबे तयार केले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. या कार्यक्रमात संविधानाची शपथ घेण्यात आली, ही संविधानाप्रतिची एकनिष्ठा असल्याचं वैष्णव यांनी नमूद केलं.
****
राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. भाजप विधीमंडळ पक्षाची बैठक आज होणार असून, त्यात पक्षाचा विधीमंडळ पक्ष नेत्याची निवड करण्यात येईल. विधानसभा निवडणुकीत १३२ जागा जिंकत भाजपा सगळ्यात मोठा पक्ष ठरला आहे. १४ व्या विधानसभेचा कार्यकाळ उद्या समाप्त होणार आहे.
****
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, राज्याचे पहिले ��ुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज कराड इथं प्रितीसंगम या त्यांच्या समाधीस्थळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिवादन केलं. ज्यांच्या विचारधारा आणि आदर्शांवर आम्ही लोकसेवेचा वारसा पुढे नेत आहोत, त्या चव्हाण साहेबांच्या दूरदृष्टीतील समृद्ध महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी लोकसेवेच्या माध्यमातून योगदान देण्याचा दृढ संकल्प आपण केला असल्याचं, पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, यानंतर वार्ताहरांशी बोलताना पवार यांनी, मुख्यमंत्रिपदासंदर्भात महायुतीतले तिनही पक्ष मिळून ठरवू आणि राज्याला स्थिर सरकार देऊ, असं सांगितलं.
****
क्रिकेट
बॉर्डर - गावस्कर चषक कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात विजयाच्या उंबरठ्यावर आहे. सामन्याच्या आजच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात आठ बाद २२७ धावा झाल्या आहेत. जसप्रित बुमराह आणि मोहम्मद सिराजने प्रत्येकी तीन, तर वॉशिंग्टन सुंदर आणि नितीश कुमार रेड्डी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. भारताला सामना जिंकण्यासाठी आणखी दोन गडी बाद करण्याची, तर ऑस्ट्रेलियाला ३०७ धावांची आवश्यकता आहे.
****
मुंबईत छत्रपती शिवाजी महराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या गुप्तचर विभागाने दोन कोटिहून अधिक किमतीचं चार किलो सोनं जप्त केलं. हे सोनं पावडरच्या स्वरुपात ठेवलं होतं. संबंधित प्रवासी मुंबईहून माले इथं जाण्याच्या तयारीत होता. 
****
अंबाजोगाई इथल्या श्री यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीने तीन दिवसीय यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह आजपासून सुरु होत आहे. मुंबई इथले विचारवंत तुषार गांधी यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन होणार असून, अध्यक्षस्थानी सिने कलावंत किरण माने असतील. या महोत्सवात कवी संमेलन, शालेय चित्रकला स्पर्धा, बाल आनंद मेळावा, गझल गायन महफिल, शेतकरी परिषद आदी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून, विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
****
0 notes
siddharthdthservice · 3 months ago
Text
Tumblr media
मिळवा फ्री टाटा प्ले कनेक्शन धमाका ऑफरमध्ये ₹2702 भरा तुमच्या टाटा प्ले अकाउंटमध्ये ₹3000 परत मिळवा.
धमाका 3K ऑफरमधून, टाटा प्ले साठी जे नवीन कस्टमर ₹2702 भरतील त्यांच्या टाटा प्ले अकाउंटमध्ये ₹3000 क्रेडिट केले जातील.आणि त्यांना कोणताही अतिरिक्त खर्च न करता एक टाटा प्ले HD कनेक्शन
देखील मिळेल | ही ऑफर भारतभरातील नवीन कस्टमसाठी लागू आहे.अधिक तपशीलासाठी कृपया आम्हाला -9823472226 ह्या नंबर वर कॉल करू शकता.
टाटाप्ले सह अंतिम मनोरंजन अनुभव अनलॉक करा!
टाटा प्ले एचडी कनेक्शन ऑफरसह तुमचे आवडते चॅनेल
आणि कार्यक्रम निवडण्याच्या स्वातंत्र्याचा आनंद घ्या.
आता, नॉन-स्टॉप मनोरंजनासाठी सज्ज व्हा कारण आम्ही तुमच्यासाठी एक आश्चर्यकारक डील आणत आहोत: तुम्ही फक्त पे करा 2702 ₹ आणि मिळवा 3000 ₹ रिचार्ज बॅलन्स आणि त्यासोबत मिळवा टाटा प्ले एचडी कनेक्शन मोफत.
3000₹ बॅलन्स मधून तुमचा आवडीचा पॅकेज निवडा आणि 3000₹ बॅलन्स वापरा आणि जोपर्यंत 3000₹ बॅलन्स संपत नाही तोपर्यंत रिचार्ज करण्याची आवश्यकता नाही.
ही ऑफर मर्यादित काळासाठी कोणतीही तडजोड न करता सर्वोत्तम मनोरंजनाचा आनंद घेण्याची तुमची संधी आहे. फक्त पे करा 2702₹ आणि मिळवा 3000₹ तुमच्या टाटा प्ले अकाउंट मध्ये सोबत मिळवा Tata Play HD कनेक्शन अगदी मोफत हा अविश्वसनीय करार चुकवू नका! त्वरा करा आणि
तुमचा मनोरंजन गेम पूर्णपणे नवीन स्तरावर
नेण्यासाठी आजच ऑफरचा लाभ घ्या! या विलक्षण ऑफरसह, तुम्हाला केवळ Tata Play HD Connection मिळत नाही तर तुमचे पसंतीचे चॅनेल निवडण्यासाठी आणि अखंड मनोरंजनाचा आनंद घेण्यासाठी 3000 रुपये शिल्लक देखील मिळत आहे. आमची रिचार्ज प्रक्रिया त्रासमुक्त आहे आणि एकदा तुम्ही रिचार्ज केल्यानंतर, तुमच्या आवडीनुसार तुमचे मनोरंजन पॅकेज कस्टमाइझ करण्याची लवचिकता तुमच्याकडे असेल.
( उदाहरणार्थ : 269₹ पॅकेज. तयार केलं तर 11 म��िने 15 दिवस किंवा 335₹ पॅकेज. तयार केलं तर 9 महिने चालेल..)
👉फायदे:-
👉कस्टमर ला मिळणार 3000/- रिचार्ज बॅलन्स
👉नविन HD कनेक्शन सोबत फ्री इन्स्टॉलेशन
👉पॅकेज / चॅनल मनाप्रमाणे निवडण्याची संधी
👉रिचार्ज Pause करण्याची सुविधा
👉 जेव्हा वाटेल तेव्हा चॅनल टाकू शकता किंवा काढू
शकता.
👉Tata Play कंपनी per day चार्ज करते
👉सोबत 2 मोबाईल वर कनेक्शन फ्री..
👉 रिचार्ज करण्यास विलंब झाल्यास कोणत्याही प्रकारचे चार्जेस नाही.
👉1 वर्षाची ऑनसाइट वॉरंटी
👉फ्री इंस्टॉलेशन अंड डिलिव्हरी
👉 त्याच दिवशी डिलिव्हरी
👉 युनिव्हर्सल रिमोट. HDMI केबल. या उत्पादनामध्ये डिश समाविष्ट केली जाईल.
👉डॉल्बी डिजिटल सराउंड साउंड
👉५× तीव्र प्रतिमा
👉१६.९ गुणोत्तर
👉१०८०i रिझोल्यूशन
👉मोफत इन्स्टॉलेशन-१० मीटर केबल फ्री नंतर १२ प्रति मीटर शुल्क आकारले जाईल.
👉२४×७ सेवा आणि सर्विस
👉कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध.
👉टीप :-हे कनेक्शन संपूर्ण भारतात उपलब्ध आहे
टाटा प्ले डीटीएच तुम्हाला एक खास अनुभव देईल, जो तुम्हाला इतर कोठेही मिळणार नाही. सर्व नवीनतम तंत्रज्ञान प्रदान करणार्‍या सर्वोत्तम DTH कनेक्शनसह तुमचे सर्व आवडते शो आणि चित्रपट तुमच्या घरच्या आरामात पहा. आता संपूर्ण कुटुंब एकत्र बसून क्रिकेट सामन्यांपासून ते डेली सोपपर्यंत टीव्ही पाहू शकते, प्रत्येकासाठी काहीतरी आहे. नव्याने लॉन्च केलेल्या कॉम्बो पॅकसह, तुम्हाला एकाच वेळी Netflix + 25 OTT aap + टीव्ही चॅनेलमध्ये प्रवेश मिळेल. म्हणूनच आपण आता म्हणतो, "एंटरटेनमेंट आणखीनच झिंगालाला..
टाटा प्ले बद्दल:👇
टाटा प्ले हे एकाच टाटा प्ले सबस्क्रिप्शनसह Pay TV आणि OTT सेवा प्रदान करणारे भारतातील अग्रगण्य सामग्री वितरण प्लॅटफॉर्म आहे. प्लॅटफॉर्मवर सध्या 600 हून अधिक चॅनेल आणि सेवा (HD, SD, परस्परसंवादी सेवा आणि मूव्ही शोकेस) आणि 25 प्रीमियम मनोरंजन Aap आहेत, ज्यामध्ये Netflix अलीकडेच मिक्समध्ये जोडले गेले आहे. याव्यतिरिक्त, टाटा प्ले भारतीय बाजारपेठेसाठी सानुकूलित केलेल्या सेवा ऑफर करते. टाटा प्ले विदेशी कहानियां, टाटा प्ले रोमान्स, टाटा प्ले क्लासिक टीव्ही, टाटा प्ले कॉमेडी, टाटा प्ले म्युझिक, टाटा प्ले फिटनेस, टाटा प्ले डान्स स्ट��डिओ आणि बरेच काही.
टाटा प्लेच्या विस्तृत ऑफर आणि योजनांसह तुमचा टीव्ही पाहण्याची क्षमता वाढवण्यासाठी सज्ज व्हा, तुम्ही सर्वोत्तम टेलिव्हिजन प्रोग्रामिंगचा अनुभव घेऊ शकता. गुणवत्ता आणि स्पर्धात्मक किंमतीबद्दलची आमची वचनबद्धता तुम्हाला तुमच्या मनोरंजन गुंतवणुकीसाठी अपवादात्मक मूल्य मिळेल याची खात्री देते. तुम्ही तुमचा टाटा प्ले DTH कनेक्शन घेण्यासाठी तयार आहात का? पुढील स्तरावर अनुभव घेऊन? टाटा प्ले टीव्ही आमच्या सर्वसमावेशक टाटा प्ले पॅकेजेससह मनोरंजनाच्या संधी उपलब्ध करून देते
टाटा प्ले DTH मनोरंजनाचे जग येथे आहे. ताज्या नवीन टाटा प्ले ऑफर आणि योजनांसाठी आम्ही तुमचा विश्वासार्ह स्रोत आहोत ज्यामुळे तुम्हाला अप्रतिम किमतीत टॉप नॉच प्रोग्रामिंगमध्ये प्रवेश मिळेल. Tata Play विविध सेवा प्राधान्ये देत चॅनेल आणि शोची विस्तृत श्रेणी एक्सप्लोर करा. Tata Play वर, आम्ही तुमच्या टीव्ही पाहण्याच्या अनुभवाला गुणवत्ता आणि मूल्य देण्यासाठी वचनबद्ध आहोत टाटा प्लेसह आमची पॅकेजेसची विस्तृत श्रेणी तुम्हाला तुमच्या मनोरंजनाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सर्वोत्तम सबस्क्रिप्शन मिळेल याची खात्री करते.
#siddharthdthservice
#tataplaychristmasoffer
#tataplaychristmasspecialoffer2024
#tataplaychristmaspecialoffer
#tataplaychristmasnewyearspecialoffer
#tataplaynewyearoffer
#tataplay
#tataplaynewconnectionoffer
#tataplaydhamaakaoffer
#tataplay3000cashbackoffer
#tataplayhd
#tataplay3000offer
#tataplaynewconnectinoffer
0 notes
loksutra · 3 years ago
Text
या दिवशी 2001 मध्ये ऑस्ट्रेलिया वॉल विरुद्ध कोलकाता कसोटीत राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मणची ऐतिहासिक भागीदारी'
या दिवशी 2001 मध्ये ऑस्ट्रेलिया वॉल विरुद्ध कोलकाता कसोटीत राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मणची ऐतिहासिक भागीदारी’
राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण: ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2001 मध्ये व्हीव्हीएस लक्ष्मण आणि राहुल द्रविड यांच्यातील ऐतिहासिक 376 धावांच्या भागीदारीला 21 वर्षे पूर्ण झाली आहेत. याबाबत व्हीव्हीएसने एकदा सांगितले होते की, त्या सामन्यात व्हायरल फिव्हरनंतरही द वॉल मैदानात उतरला होता. सध्या क्रिकेट खूप वेगवान झाले आहे. आता कसोटी सामन्यात 500 धावा देखील दिसतात, त्यामुळे 600,700 खूप जास्त आहेत. पण एक काळ असा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
Sachin Tendulkar : 32 वर्षांपूर्वी.... या दिवशी 17 वर्षीय सचिनने पहिले कसोटी शतक झळकावून पराक्रम केले
Sachin Tendulkar : 32 वर्षांपूर्वी…. या दिवशी 17 वर्षीय सचिनने पहिले कसोटी शतक झळकावून पराक्रम केले
Sachin Tendulkar : 32 वर्षांपूर्वी…. या दिवशी 17 वर्षीय सचिनने पहिले कसोटी शतक झळकावून पराक्रम केले आज 14 ऑगस्ट हा दिवस भारतीय क्रिकेट आणि सचिन तेंडुलकरसाठी खूप खास आहे. 1990 मध्ये या दिवशी सचिनने पहिले कसोटी शतक झळकावले होते. हे मास्टर ब्लास्टरचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले शतक होते. इंग्लंडविरुद्धच्��ा मँचेस्टर कसोटीत त्याने हा पराक्रम केला. … मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 2 years ago
Text
115 वर्षांपूर्वी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये घडला करिष्मा, अवघ्या 12 धावांत ढीग झाला हा संघ
115 वर्षांपूर्वी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये घडला करिष्मा, अवघ्या 12 धावांत ढीग झाला हा संघ
प्रथम श्रेणी क्रिकेट: 115 वर्षांपूर्वी या दिवशी म्हणजेच 11 जून 1907 रोजी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एक मोठा करिष्मा घडला होता. इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या काउंटी क्रिकेटमध्ये या दिवशी नॉर्थम्प्टनशायरचा संपूर्ण संघ केवळ 12 धावांवर बाद झाला. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील ही आतापर्यंतची दुसरी सर्वात कमी धावसंख्या आहे. 12 षटकात 12 धावा आणि 10 विकेट्सहा काउंटी सामना नॉर्थम्प्टनशायर आणि ग्लुसेस्टर यांच्यात…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
दुलीप ट्रॉफी फायनल, दुसरा दिवस: बाबर इंद्रजितने शतक ठोकले कारण दक्षिण विभाग विरुद्ध पश्चिम विभाग पहिल्या डावात आघाडीवर आहे. क्रिकेट बातम्या
दुलीप ट्रॉफी फायनल, दुसरा दिवस: बाबर इंद्रजितने शतक ठोकले कारण दक्षिण विभाग विरुद्ध पश्चिम विभाग पहिल्या डावात आघाडीवर आहे. क्रिकेट बातम्या
दुलीप ट्रॉफी फायनलच्या मनोरंजक दुसऱ्या दिवशी बाबा इंद्रजीथचे धडाकेबाज शतक आणि कृष्णप्पा गौथमच्या 43 धावांच्या जोरावर दक्षिण विभागाने पश्चिम विभागाच्या पहिल्या डावातील धावसंख्येला मागे टाकले. इंद्रजितच्या 125 चेंडूत 118 धावा, मनीष पांडे (48) आणि गौथम (55 चेंडूत 43) यांच्या योगदानामुळे दक्षिणेने दुस-या दिवसाचा सात बाद 318 धावा केल्या – पश्चिम विभागाच्या पहिल्या डावातील 270 धावसंख्येपासून 48 धावा…
View On WordPress
0 notes
nitinkandharkar · 3 years ago
Text
१९८३...
आमच्या लहानपणी मैदानी खेळ खेळणे, अन त्यात प्रामुख्याने क्रिकेट खेळणे हा आमचा आवडीचा छंद. अगदी कळायला लागले तसे आम्ही भावंडे क्रिकेट खेळायचो. अर्थात खेळ कमी अन भांडणे जास्त व्हायची, पण तरीही खेळणे कमी झाले नाही. मोठा प्रवीण अन धाकटा बाळू छान खेळायचे, मी मात्र लिंबूटिंबू असायचो. बॉलर पळत आला की मला भीतीच वाटायची, त्यामुळे फिल्डींग आणि क्वचित बॉलिंग करून समाधान मानून घ्यायचो.
तो काळ असा होता की नुकतेच वन डे मॅचेस सुरू झाले होते. एक दिवसात संपणार्‍या मॅचेसची एवढी क्रेझ वाटायची नाही. टेस्ट मॅचेसची सवय झाली होती. पाच दिवस खेळ अन एक दिवस सुट्टी अशी सहा दिवस मॅच चालायची. दोन किंवा तीन दिवसानंतर एक दिवस सुट्टी असायची. त्या सुट्टीच्या दिवशी खूप राग यायचा. गावस्कर, विश्वनाथ, अमरनाथ, वेंगसरकर आदी चांगले खेळत असतांना नेमकी सुट्टी यायची. तो दिवस कधी एकदा संपतो असे होवून जायचे. भारतात मॅच असली तर दिवसभर कुठे न कुठे रेडिओवर कॉमेंट्री ऐकायला मिळायची. इंग्लंड, वेस्ट इंडीज अशा ठिकाणी रात्री अकरा साडे आकरापर्यंत मॅच चालायची. शॉर्ट वेव्हवर वेगवेगळ्या ठिकाणी ट्रांझिस्टर नेऊन खर...खुर...करणार्‍या ट्रांझिस्टरला रेंज मिळवून देण्याची धडपड चालायची. फिलिप्सच्या मोठ्या रेडिओवर मात्र चांगला आवाज यायचा. पण मध्येच रेंज गेली की खूप राग यायचा. त्याला थापट्या मारून हात दुखायचे.
उन्हाळ्यात ट्रांझिस्टर घेवून तिसर्‍या मजल्यावर (गच्चीवर) अंथरलेल्या गार गार गादीवर, स्वच्छ चंद्रप्रकाशात पहुडत कॉमेंट्री ऐकायची जी मजा यायची ती आज टिव्हीवर मॅच पाहण्यातही नाही! दिसत काहीच नसले तरी डोळ्यासमोर सर्व स्वच्छ दिसायचे. कॉमेंट्री सांगणारे इतके छान सांगत की संपूर्ण मैदान डोळ्यासमोर उभे रहायचे.
टिव्हीचा प्रसार व्हायच्या पूर्वीचा तो काळ होता. पेपरमध्ये येणार्‍या क्रिकेटच्या फोटोंची कात्रणे करून जुन्या वहीत चिटकावणे हा उन्हाळ्यातला आमचा छंद होता. त्या काळी कलर फोटो नसायचे. ब्लॅक अँड व्हाईट फोटो मध्ये गावस्करला ड्राईव्ह करतांना, किरमानीला डाय मारून कॅच पकडतांना, असे नुसते फोटो पाहूनच अंगावर शहारे यायचे.
‘एक कपील देव नावाचा फास्ट बॉलर आलाय. खूप जोरात बॉलिंग टाकतो तो’. १९७८ साली शाळेतून आल्यावर गल्लीतल्या मित्रांसोबत गप्पा मारतांना नवीन बातमी मिळाली होती. कल्पनेनेच तो एक उंचापुरा, धष्टपुष्ट असावा असा अंदाज बांधला होता. तोवर फास्ट बॉलर म्हणजे काय हे माहितच नव्हते. बेदी, प्रसन्ना, चंद्रशेखर, वेंकट राघवन, दिलिप दोशी असे स्पिनर्सच माहित होते.
‘अरे कपील देव काहीच नाही, योगराज सिंग म्हणून एक त्याच्यापेक्षाही फास्ट बॉलर आहे. पण त्याला टीममध्ये घेतले नाही.’ आमच्यापेक्षा वयाने मोठा असलेल्या एका मित्राने माहीती पुरवली. यावर बर्‍याच गप्पा रंगल्या. वेस्ट इंडीजमध्ये कसे धिप्पाड आक्राळ ��िक्राळ बॉलर आहेत, आपल्याकडे मात्र फक्त स्पिनर्स आहेत. नाही म्हणायला अबिदअली, करसन घावरी असे बॉलर होते, पण फास्ट बॉलर म्हणण्यासारखा हा कपील देव टीममध्ये आला आहे हे ऐकून हरखून गेलो होतो.
याच गप्पात १९७५ साली पहिली वनडे वर्ल्ड कप झाली अन वेस्ट इंडीजने जिंकली हे कळले. ‘त्या वर्ल्डकप मध्ये ओपनिंगला येवून गावस्कर संपूर्ण ६० ओव्हर्स खेळून नॉट आऊट राहिला, पण फक्त ३६ रन केले’ अजून एकाने माहिती दिली. या गप्पात अशी माहिती फक्त तोंडीच दिली जायची असे नाही. अगदी अ‍ॅक्शन करून कोण कसे शॉट मारतो, कोण कशी बॉलिंग करतो, मनगटाचे जॉईंट नसलेला चंद्रशेखर कसे बॉल टाकतो, हे कुठेही कधीही मॅच न पाहणारे अगदी रंगवून सांगायचे. त्यामुळे कल्पनाविश्वात रमायला खूप मजा यायची.
१९७९ चा वर्ल्डकपही वेस्ट इंडीजने जिंकला हे पेपरमध्ये वाचून कळले होते. डेस्मंड हेंस, गार्डन ग्रीनिज, क्लाईव्ह लॉईड, मायकल होल्डींग, माल्कम मार्शल, जोएल गार्नर, जेफ्री दुजां अशा धिप्पाड खेळाडूंचे फोटो पाहून त्यावेळी धडकीच भरायची. एकेकाळी बॉडीलाईन बॉलिंग करून त्यांनी अंशुमन गायकवाड, गावस्कर, वेंगसरकर, फारुख इंजिनिअर अशा खेळाडूंना मैदानावरच जायबंदी केले होते हे पेपरमध्ये वाचले होते. अशा या टीमला तेव्हा काहीच चॅलेंज नव्हते.
हे सर्व आज परत आठवायचे कारण म्हणजे ‘१९८३’ हा सिनेमा नुकताच दुसर्‍यांदा पाहिला आणि तो पहात असतांना डोळ्यासमोर त्यावेळचं सगळं चित्र अगदी हुबेहुब तरळलं.
१९८३ च्या वर्ल्डकपपर्यंत वनडे मॅचेसचे बरेचसे आकर्षण वाढले होते. पेपरमध्ये रोज त्याबद्दल वाचायला मिळत होते. भारत एकेक मॅच जिंकत फायनलला पोहोचला होता. न भुतो न भविष्यती असा तो क्षण होता. असे असले तरी आकाशवाणीच्या मेडियम वेव्हवर भारतीय स्टेशनवर कॉमेंट्री नव्हती. तिथे बातम्या आणि इतर कार्यक्रमच चालले होते. कदाचित भारतीय टीम असे काही शौर्य करेल हे आकाशवाणीच्या मनालाही शिवले नसावे. त्यामुळे शॉर्टवेव्हवर लागणार्‍या परदेशी स्टेशनवर अवलंबून असावे लागायचे.
फायनल मॅचच्या दिवशी आमच्या रेडिओच्या माडीत फिलिप्सच्या मोठ्या रेडिओवर कॉमेंट्री लावलेली होती. मॅचसाठी दादा (वडील) कोर्टातून लवकर घरी आले होते. मी वरती जाऊन कॉमेंट्री ऐकत बसलो होतो. बैठकीतले काम आटोपून दादाही वरती आले. शॉर्टवेव्ह मुळे खुपदा व्यत्यय येत होता. त्यात इंग्रजी कॉमेंट्री सुरू झाली की मला फार राग यायचा! अशावेळी काय झाले ते दादांकडून कळायचे.
श्रीका��त आऊट होवून परतला आणि नंतर गळती सुरू झाली. कसेबसे १८३ रन झाले! आम्ही उदास झालो होतो. त्यांच्या लंच टाईममध्ये आम्ही डिनर आटोपून परत वरती येवून बसलो. लंचनंतर वेस्टइंडिज खेळायला उतरला आणि लाईट गेले! अंधारात ट्रांझिस्टर शोधून काढला. बाहेर सज्जात (गॅलरीत) बबर्‍याने गाद्या टाकून ठेवल्या होत्या. त्यावर बसून ट्रांझिस्टर सुरू केला. तोवर त्यांचे दोन आऊट झाले होते, पण विव्ह रिचर्डस मात्र ठोकत होता.
‘रिचर्ड्स आ��ट होतो का नाही रे..’ दादांनी मला विचारले.
‘अ‍ॅ हॅ, तो खूप तगडा आहे. काय करतो कुणास ठाऊक!’ मनातून तो लवकर आऊट व्हावा असे वाटत असले तरी मी मोघम उत्तर दिले. आऊट होतो म्हणावं अन नाही झाला तर काय घ्या! असं प्रत्येकवेळी दादा विचारायचे आणि मी असेच मोघम उत्तर द्यायचो. मोघम उत्तर दिले तरच मनातले घडते अशी माझी (अंध)श्रद्धा होती!
...आणि तो क्षण आला! ‘गेंद आसमान छूती हुयी बाँड्री लाईन की तरफ जा रही है, उसके पिछे कपीलदेव दौड रहे है, अब देखना है वो ये कॅच पकड पाते है या नही..... और... और...’ असे ���ॉमेंट्रेटर म्हणाला अन नुसता प्रेक्षकांच्या ओरडण्याचा गोंधळाचा आवाज येवू लागला. माझी छाती धडधड करू लागली. नेमके काय झाले काहीच कळेना. जवळजवळ दोन तीन मिनिटानंतर ‘ये गजब हो गया! मेरी जिंदगी मे पहली बार मैंने ये देखा है. कोई खिलाडी बीस तीस गज पिछे दौडते हुये इतनी महत्वपूर्ण कॅच पकड लेता है ये दृश्य विलोभनिय है.....’ हे वाक्य ऐकून मी तर उड्याच मारायला लागलो. दादाही तक्क्याला टेकून सरसावून बसले. खुशीत त्यांनी पानपुडा उघडला. तंबाखू हातावर चोळून मस्तपैकी फक्की मारली. मला लक्षात आले की जवळपास तास दिड तासापासून त्यांनी पानपुड्याला हात लावला नव्हता!
एकदाचा रिचर्डस आउट झाला अन त्यांचे एकेक विकेट पडायला लागले. मोहिंदर अमरनाथने तर कमालच केली होती. अन पाहता पाहता भारत जिंकला! वेस्टइंडीजची हॅटट्रिक चुकली आणि त्यांची मिजासही उतरली. मैदानावरचा गोंधळ, प्रेक्षकांचा आवाज, लॉर्डसच्या गॅलरीत कपीलदेवने वर्ल्डकप हातात घेवून उंचावला...हे सारे कॉमेंट्रेटर सांगत होते. कल्पनेनेच सारे दृश्य आमच्या डोळ्यात साठत होते.
आनंदाने मी तर नाचतच सुटलो होतो. क्रिकेटमध्ये काहीतरी झाले आहे अन भारत जिंकला आहे हे आईला लक्षात आले होते. रात्रीचे साडेआकर��� वाजून गेले होते तरी खाली जाऊन ती गरम गरम मसाला दूध घेऊन वरती आली. ते वाफाळलेले दुध पित पित डोळ्यासमोर लॉर्डसचे मैदान आणत रात्री खूप उशीरा केंव्हातरी डोळा लागला...
तो आनंदाचा क्षण, ते रोमांच, वाडा, गल्ली, रेडिओची माडी, सज्जा, फिलिप्सचा रेडिओ, छोटा ट्रांझिस्टर, दूर कुठेतरी वाजलेले फटाके, गरम मसाला दुध...हे सारे चित्र आज या सिनेमामुळे ३९ वर्षानंतर डोळ्यासमोर जसेच्या तसे अगदी लख्ख उभे राहिले, अन अंगात उगाच एक नवीन ऊर्जा निर्माण झाल्यासारखे वाटले...
नितीन म. कंधारकर
औरंगाबाद.
0 notes
kokannow · 3 years ago
Text
झुंझार मित्र मंडळ आयोजित क्रिकेट स्पर्धेत नित्या स्पोर्ट्स खारेपाटण संघ विजेता तर विग्नेश के सी सी खारेपाटण संघ उपविजेता
झुंझार मित्र मंडळ आयोजित क्रिकेट स्पर्धेत नित्या स्पोर्ट्स खारेपाटण संघ विजेता तर विग्नेश के सी सी खारेपाटण संघ उपविजेता
टेनिस बॉल टॉप क्रिकेटर कृष्णा सातपुते स्पर्धेचे खास आकर्षण खारेपाटण : झुंझार मित्र मंडळ खारेपाटण आयोजित भव्य मोठ्या रकमेच्या ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या आजच्या शेवटच्या दिवशी झालेल्या अंतिम सामण्यात संघ विजेता ठरला तर संघ उपविजेता ठरला.तर या स्पर्धेचा खास आकर्षण ठरला तो टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेतील टॉपर खेळाडू कृष्णा सातपुते.त्याने उपांत्य व अंतिम सामन्यात धुवांधार फलंदाजी करत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
hugepunch1 · 3 years ago
Text
इतर ट्रिप्स
Tumblr media
भरतपूर पक्षी अभयारण्यातून आल्यापासून मुले पक्षी बघायला शिकली आहेत. मारुंजीच्या आवारात, संध्याकाळी फिरायला गेल्यावर, ट्रेकिंगला गेल्यावर मुलांचे पक्ष्यांकडे, त्यांच्या आवाजाकडे लक्ष असते. अदितीपण घरी आल्यावर जेव्हा सकाळी आम्ही कॉफी घ्यायला बागेत बसतो, तेव्हा झाडावर दिसणारे पक्षी आवर्जून आम्हाला दाखवते. विशेष मुलांचे असे निसर्गाशी व आजूबाजूच्या जगाशी जोडले जाणे बघून मला खूप समाधान मिळते.
बांधवगड जंगलातील सफर –
सलग पाच वर्षे ह��मालयात ट्रेकिंगला नेऊन आणल्यावर मुलांना इतरही अनुभव द्यावेत असे वाटत होते. कुठे न्यावे याबद्दल विचार करताना मुलांना प्राणी बघायला जंगलात घेऊन जावे, असे वाटले. अॅडव्हेंचर क्लब मेंबरशी चर्चा करताना मध्यप्रदेशातील बांधवगडच्या जंगलात नेऊया, असे ठरले. या जंगलात वाघाचे दर्शन होतेच व इतरही प्राणी आहेत अशी माहिती मिळाल्यामुळे आम्ही २०११ साली बांधवगडला जायचे ठरवले. नेहमी प्रमाणेच नक्की कार्यक्रम कसा करता येईल हे ठरल्यावर पालकांशी मीटिंग घेऊन त्यांना पूर्ण कार्यक्रम समजावून सांगितला. अनेक पालकांनी मुलांना पाठवण्याबाबत उत्सुकता दाखवली. २७ मे ते ४ जून असा हा कार्यक्रम ठरविला, कारण या दिवसात जंगलामध्ये वाघ व इतर प्राणी बघायला मिळण्याची शक्यता जास्त असते. रेल्वेने सकाळी ११ पर्यंत जबलपूरला पोहोचलो. नाष्टा वाटेतच घेतला होता. येथे एका हॉटेलमध्ये आमची एका दिवसापुरती राहायची सोय केलेली होती. फ्रेश होऊन आम्ही जेवायलाच गेलो. हॉटेलमधील कर्मचारी खूप चांगली मदत करत होते. जेवण झाल्यावर आम्ही बेढाघाट बघायला गेलो. बेढाघाटला पोहोचेपर्यंत सूर्यास्त व्हायला आला होता. त्या सूर्यकिरणामध्ये बेढाघाट येथील धबधबा फार सुंदर दिसत होता. तेथे आम्ही सर्वांनी नर्मदा नदीमध्ये बोटींग केले व नंतर रात्री तेथेच साऊंड अॅड म्युझिक शो बघितला. मुलांना हे सर्व अनुभव नवीन होते. मुले थकलेली असूनसुद्धा खूप उत्साहाने हे सर्व अनुभव घेत होती.
दुसऱ्या दिवशी नाष्टा झाल्यावर आम्ही ते हॉटेल सोडले. चार तास बसने प्रवास करून आम्ही बांधवगड जवळच जंगलाला लागूनच असणाऱ्या हॉटेलवर पोहोचलो. हॉटेल फारच छान होते. एकंदर व्यवस्थापन समाधानकारक होते. सर्वांना कॉटेजेस् ताब्यात मिळून सामान लावेपर्यंत दुपारी जेवणाची वेळ झाली. दुपारचे जेवण फारच स्वादिष्ट होते. सगळ्यांनीच जेवणावर मस्त ताव मारला. दुपारी अनेकांनी आराम केला. अर्थात विशेष मुलांबरोबर फार शांततेत काही होत नाही. त्यांची चुळबूळ चालूच राहाते. मुलींच्या कॉटेजमध्ये मात्र काही मुलींना घेऊन आम्ही मस्त पत्त्याचा डाव टाकला. संध्याकाळी चहा बिस्किटे घेऊन झाल्यावर सर्वजण मिळून थोड्यावेळ क्रिकेट खेळलो. रात्रीच्या जेवणाची व्यवस्था बागेमध्येच केली होती. जंगलामध्ये चांदण्याच्या प्रकाशात जेवायची मजा काही औरच. जेवण झाल्यावर सगळे झोपायला गेलो, कारण उद्या सकाळी लवकर उठून आम्हाला जंगल सफारीला जायचे होते. पहाटे ५.३० वाजता सगळेजण आवरून, फ्रेश होऊनच चहा बिस्किटे घ्यायला भेटलो. नाष्टा जंगल सफारीहून आल्यावर केला. येथूनच ��ीपने आम्ही जंगल सफारीला निघालो. येथे जंगल सफारीचे नियोजन सकाळी व संध्याकाळीच करतात, कारण याचवेळी पक्षी व प्राणी दिसायची शक्यता जास्त असते.
एका उघड्या जीपमध्ये सहाजण बसतील अशी व्यवस्था होती. आम्ही पाच मुले व एक स्वयंसेवक असे सहाजण एकेका जीपमध्ये बसलो. यानंतर दोन दिवसांत सकाळ संध्याकाळ असे मिळून चार वेळा जंगल सफारीमध्ये आम्ही अनेक अद्भुत अनुभव घेतले. जंगलामध्ये आम्हाला अनेक प्रकारचे पक्षी दिसत होते. एका पाणवठ्यावर माकडे पाणी पिताना दिसली. आम्ही हे दृश्य बघतच होतो एवढ्यात हरणे, नीलगाय व रानडुकरे येथे पाणी प्यायला आली. संध्याकाळी जंगलात जीपमधून फिरताना अनेकांना वाघाने दर्शन दिले. ज्या मुलांना आज वाघाचे दर्शन झाले ते उत्साहाने, त्यांना जमेल तसे हा सगळा अनुभव सांगायचा प्रयत्न करत होते. ज्यांना आज वाघाचे दर्शन झाले नाही, ते जरा नाराजच होते. मुले या जंगल सफारीचा पुरेपूर आनंद घेत होती. रात्रीच्या जेवणावर सगळेजण खुश होते. रात्री जेवण झाल्यावर सगळ्यांनी एकत्र जमून कँप फायरचा कार्यक्रम केला. यामध्ये नाच, गाणी, चिठ्ठ्या उचलून त्यामध्ये जी सूचना लिहिलेली असेल त्याप्रमाणे करून दाखवणे, यामध्ये माझ्यापासून सगळ्यांनाच ते करायचे होते. मुलेसुद्धा जमेल तसे करत होती. काही वेळा सादरीकरण करताना इतकी गडबड व्हायची की, ते बघून सगळ्यांची हसून हसून पुरेवाट लागायची. हीच तर या ट्रिप्सची मजा असते. कँप फायरच्या वेळी घ्यायच्या पूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी अनघाने घेतली होती व तिने याचे खूप छान नियोजन केले होते.
दुसऱ्या दिवशी पहाटे परत आम्ही जंगलात निघालो. आज सकाळी नाष्टा झाल्यावर अमोल माझ्याजवळ आला व मला दहा रुपये दिले व म्हणाला, ‘मॅडम, तुम्ही या पैशाचे चॉकलेट घेऊन खा.’ म्हटले, ‘कशाबद्दल मला चॉकलेट?’ तर म्हणतो कसा, ‘मॅडम, तुम्ही आमच्याकरता किती करता म्हणून तुम्हाला बक्षीस.’ तेवढ्यात राजही तिथे आला व म्हणाला, ‘मॅडम थँक्यू सो मच, आम्हाला प्राणी दाखवायला आणल्याबद्दल.’ चला म्हणजे मुले एकदम खुश होती.
दुसऱ्या दिवशीही अनेक पक्षी, प्राण्यांनी दर्शन दिले. त्यामध्ये अस्वल, लांडगा व तरस असे काही काल न दिसलेले प्राणी दिसले. आमच्या जीप ड्रायव्हरला, जवळून गेलेल्या एका जीप ड्रायव्हरने सांगितले की, एका गुहेमध्ये वाघ बसलाय. वाघ दिसला तर हे ड्रायव्हर लगेच एकमेकांना सांगतात, कारण त्यांचीही मनापासून इच्छा असते की जंगल सफारीला आलेल्या प्रत्येकाला वाघ दिसावा. जीप जंगलामध्ये वेगवेगळ्या मार्गाने जात असतात. आमच्या जीप ड्रायव्हरने जीप तिकडे वळवली. आम्ही तिथे पोहोचेपर्यंत आमच्या सर्व जीपस् तेथे पोहोचलेल्या होत्या व सर्वजण एका दिशेने बघत होते. आम्हीपण त्या दिशेने बघायला लागलो आणि चक्क आरामात गुहेंच्या दाराशीच बसलेला वाघ दिसला. त्याला सर्व जगाची, बघणाऱ्या लोकांची काही फिकीर नव्हती. सगळेजण तृप्त नजरेने हे दृश्य बघत होते. बांधवगडला जंगल सफारीला आल्याचे सार्थक झाले, असे सगळ्यांना वाटत होते. विशेषतः सर्व स्वयंसेवक व मुले पण वाघ दिसला म्हणून खुश होती. थोड्यावेळानंतर आम्ही परतीच्या वाटेला लागलो. वाटेमध्ये एका पाणवठ्यावर एक मोर पूर्ण पिसारा फुलवून नाचत होता व त्याच्या आजूबाजूला लांडोर मस्त दिमाखात फिरत होती. पाण्यामध्ये काही बदके पोहत होती, तर काही बदके किनाऱ्यावर फिरत होती. हे दृश्य खरंच बघतोय का हे स्वप्न आहे असे वाटावे, इतके ते सुंदर दृश्य होते.
सकाळी जंगल सफारीहून आल्यावर मुलांनी स्विमिंग पूलमध्ये, पाण्यात खेळण्याचा व काही जणांनी पोहण्याचा आनंद घेतला. याही रात्री कँप फायरचा कार्यक्रम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी नाष्टा झाल्यावर हॉटेलच्या बाजूला असलेल्या जंगल परिसरात फिरून जंगलामध्ये स्वच्छता मोहीम व जंगलाची माहिती असा कार्यक्रम झाला. आम्हाला जंगलाची माहिती सांगणारा गाईड पुण्यातीलच होता. त्यामुळे तो मराठीमधून बोलत होता. त्यामुळे मुलांना पण त्याने सांगितलेली माहिती समजायला सोपे जात होते. पूर्वीच्या लोकांना जंगलात फिरताना वारुळाचे तोंड कुठल्या दिशेला आहे यावरून नदी कोठे आहे हे कळायचे. वारुळाच्या आत उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून मुंग्या विशिष्ट रचना करून वारूळ बांधतात. अनेक पक्ष्यांची घरटी आम्ही बघितली. पक्षी आता बदललेल्या परिस्थितीनुसार प्लॅस्टिकचा वापर घरटे तयार करण्याकरता कसे करायला लागले आहेत, हे बघितले. अशा अनेक निसर्गातील गमतीजमती आम्हाला या गाईडमुळे समजल्या. हा परिसर जंगलात फिरायला सुरक्षित होता, म्हणून हा जंगल वॉक आम्ही करू शकलो. जंगल सफारीमध्ये जंगलात जीपच्या खाली उतरायला, जोरात बोलणे, मोबाईलचा वापर, कचरा फेकणे, खायचे पदार्थ जंगलात नेणे व प्राण्यांना खायला देणे या सगळ्याला सक्त बंदी होती. जंगल सफारीच्या गाईडने जंगलात फिरतानाचे हे सर्व नियम पाळल्याबद्दल मुलांचे खूप कौतुक केले. एकंदर बांधवगड जंगल सफारी हा नितांत सुंदर अनुभव होता.
थायलंडची ट्रिप –
मुलांची बांधवगड जंगलाची सफर झाल्यानंतर मुलांना परदेशी ट्रिपला न्यावे, असे मनात यायला लागले. खरं म्हणजे हा विचार अनेकदा मनामध्ये येत होता, पण त्यामधील अडचणी डोळ्यांसमोर आल्यावर तो विचार मागे पडायचा. २०१२मध्ये या विचाराने परत उचल खाल्ली व यावेळी विचार पक्का झाला की, यावर्षी मुलांना परदेश वारी करावयाची. या ट्रिपमुळे मुलांना विमानात बसायला मिळेल. याशिवाय दुसऱ्या देशातील लोक दिसतात कसे, तेथील हवामान कसे असते, तेथील घरे कशी असतात, एकंदर दुसरा देश कसा असतो याची ओळख तरी मुलांना होईल, असे वाटत होते.
मुख्य अडथळा मुलांचे ��ासपोर्ट. अनेक मुलांचे पासपोर्ट नव्हते व विशेष मुलांचे पासपोर्ट मिळायला त्रास होतो, असे ऐकले होते. मुलांना कुठल्या देशाला न्यावे हे आर्थिक बाबींवर ठरणार होते. सिंगापूर, थायलंड व मलेशिया असे तीन पर्याय समोर होते. अशा ट्रिप्सचे आयोजन करणाऱ्या अनेकांना जाऊन भेटलो. साईदत्त टुरिझम यांनी सुचविलेला थायलंडचा पर्याय बरा वाटला. चार रात्री व पाच दिवसांसाठी त्यांनी सांगितलेले ट्रिपचे बजेटसुद्धा योग्य वाटले. या ट्रिपसाठी ठरावीक संख्येने लोक असतील तर काही सवलती असतात व ट्रिपचा खर्चपण थोडा कमी होऊ शकेल, असे आम्हाला साईदत्त टुरिझमच्या शेवडे यांनी सांगितले. आम्ही सर्व माहिती मिळाल्यावर मुलांना नियमितपणे आमच्याबरोबर ट्रिप व ट्रेक्सला पाठवणाऱ्या पालकांची मीटिंग बोलावली. पालकांना ट्रिपच्या खर्चाचा अंदाज देऊन बाकी सर्व माहिती सांगितली. सर्व ऐकून घेतल्यावर पालकांच्या प्रतिक्रया फार उत्साहवर्धक होत्या. आपली मुले परदेशी ट्रिपला जाणार या कल्पनेनेच ते भारावून गेले होते. विशिष्ट संख्या होण्यासाठी आम्ही काही पालकांनाही थायलंड ट्रिपला बरोबर येता येईल, असे सांगितले. पालकांना ट्रेक्सला नेत नाही कारण त्यांना ट्रेकिंगची सवय नसते. त्यामुळे त्यांची मदत होणार नसते. या ट्रिपला फारसे चालायचेही नव्हते, त्यामुळेच आम्ही ठरावीक पालकांना घेऊन जाऊ शकत होतो. यावेळी माझी वहिनी मंजू व तिची मैत्रीण आमच्याबरोबर येणार होत्या. एकदाची मुलांची व त्याबरोबर येणाऱ्या पालकांची यादी तयार झाली. नवक्षितिजमधून किती सहकाऱ्यांना न्यायचे ते नक्की केले, कारण त्यांचेही पासपोर्ट काढायला हवे होते. अॅडव्हेंचर क्लब सदस्य अॅडव्होकेट सुनील कदम व अॅडव्होकेट सुदेश हाडके यांचे कुटुंबीय आमच्याबरोबर येणार होते. सर्व मिळून ४४ जणांचा ग्रुप तयार झाला.
आता पुढची मुख्य तयारी पासपोर्ट. पालकांना पासपोर्टच्या तयारीला लागा असे सांगितले व लागेल ती मदत आम्ही करू, असे आश्वासन दिले. पासपोर्टसाठी मतिमंदत्वाच्या दाखल्याबरोबरच इतर बरीच कागदपत्रे लागणार होती. एकदा मी व विश्वस्त अॅड. सुदेश हाडके पासपोर्ट ऑफिसमधील ऑफिसरला भेटून थायलंड ट्रिप व नवक्षितिजबद्दल माहिती सांगून आलो होतो. हळूहळू मुलांच्या पासपोर्ट मुलाखतीच्या तारखा मिळू लागल्या. विशेष मुलांना त्या पासपोर्टच्या रांगेमध्ये थांबायला लावणे म्हणजेसुद्धा एक परीक्षाच होती. या मुलांसाठी विशेष व्यवस्था करायला हवी, असे मला प्रकर्षाने जाणवले. म्हणजे त्यांना रांगेमध्ये फारवेळ थांबायला लागणार नाही.
लवकर विमानाची तिकिटे काढली तर स्वस्त दरात मिळतात. म्हणून २८ जून ते ३ जुलै ही ट्रिपची तारीख ठरवून तिकिटे बुक केली. विमानाच्या तिकिटात सवलत मिळावी म्हणून बरेच प्रयत्न केले, पण ती काही मिळाली नाही. ट्रिपची बाकी तयारी सुरूच होती. साईदत्तचे संच���लक शेवडे एकदा संस्थेमध्ये पालकांशी संवाद साधून त्यांच्या शंकांचे निरसन करण्याकरता आले होते. परत एकदा मीटिंग बोलावून स्वयंसेवकांचे कामाचे स्वरूप काय आहे, हे आमच्याबरोबर येणारे सर्वजण व नवक्षितिजच्या सहकाऱ्यांना मी समजावून सांगितले. पूर्ण प्रवासात सतर्कतेने मुलांकडे लक्ष पाहिजे, मुलांबरोबर जाताना खरेदीसारखी गोष्ट दुय्यम असते. त्यांना सुरक्षित नेणे व आणणे ही गोष्ट सर्वात महत्त्वाची, हे त्यांना परत परत पटवून देत होते. मुलांप्रमाणेच अनेक पालक व माझ्या सर्व सहकाऱ्यांची ही पहिली परदेशवारी होती. त्यामुळे तेथे पोहोचल्यावर लक्ष विचलित व्हायची शक्यता जास्त. असे होऊ नये म्हणून हे सारखे सांगावे लागत होते. पालक म्हणून असलेल्या भूमिकेपेक्षा स्वयंसेवकांची भूमिका वेगळी असते. त्याला पडेल ते काम करायची मानसिक तयारी ठेवावी लागते. म्हणून पालकांना स्वयंसेवकांची भूमिका समजावून सांगावी लागत होती.
ट्रिपला एक दिवस राहिला तरी दोन पासपोर्ट मिळेनात, त्यामध्ये एक अदितीचा पासपोर्ट होता. आता मात्र सगळ्यांनाच जरा टेन्शन आले. मी स्वतः परत जाऊन पासपोर्ट ऑफिसमधील प्रमुख मॅडमना भेटून सर्व परिस्थिती समजावून सांगितली. हे समजून घेतल्यावर मॅडमने सहकार्याचे आश्वासन दिले व आजच पासपोर्ट मिळतील असे सांगितले आणि चक्क संध्याकाळी हातात पासपोर्ट मिळाले. पण ऑफिस संपेपर्यंत काही सह्या राहिल्या आहेत म्हणून एक सहकारी सुभाषचा पासपोर्ट मिळालाच नाही. हे समजेपर्यंत मॅडम ऑफिसमधून गेल्या होत्या. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्हाला निघायचे होते. दुसऱ्या दिवशी सकाळपासून नवक्षितिजचे व्यवस्थापक वायाळ व अजून एक सहकारी पासपोर्ट ऑफिसमध्ये जाऊनच बसले. दुपारी तीन वाजले तरी पासपोर्ट तयार होईनात व तयार झाल्यावर येथून ते जीपीओला जाणार व तेथून पोस्टाने घरी येणार. आता आम्हाला हे सगळे करायला वेळच नव्हता. चार वाजायला आले तरी अजून पासपोर्टचा पत्ता नाही. या सहकाऱ्याचे, सुभाषचे सामान आम्ही तयारच ठेवले होते. पण याला आमच्याबरोबर येत येणार की नाही, अशी चलबिचल सगळ्यांच्याच मनात सुरु होती. आम्ही सर्वजण चिंतेतच होतो. एवढ्यात फोन वाजला की पासपोर्टस् हातात मिळाला. सगळ्यांनी एकच जल्लोष केला. पासपोर्ट ऑफिसमधील मॅडमने आमची असहायता समजून पासपोर्ट जीपीओला न पाठवता तेथेच आमच्या ताब्यात दिला. चला म्हणजे आता सर्वजण थायलंडला जाणार येऽऽऽ असे मलाही आनंदाने ओरडावेसे वाटले. ट्रिपला जाऊन आल्यावर मुद्दाम जाऊन मॅडमला मनापासून धन्यवाद देऊन आले. इतक्या वर्षांनंतर पण हा अनुभव लिहिताना अंगावर रोमांच आले आहेत.
नऊ वाजता आम्ही बसने मुंबईला जायला निघालो. गणपती बाप्पा मोरयाच्या गजरातच प्रवास सुरु झाला. सर्वांना जायला मिळतंय म्हणून सगळेच आनंदात होते. पहाटे आम्हाला थायलंडला जाणाऱ्या विमानात बसायचे होते. मुंबई विमानतळावर आम्हाला महेश हे सा��दत्तचे ग्रुप लीडर भेटले. ते पूर्ण प्रवासात आमच्याबरोबर असणार होते. विमानतळावर मुले आश्चर्याने सगळीकडे बघत होती, कारण सगळे वातावरणच अनोळखी होते, पण मुले शांत होती. सुरक्षा तपासणी झाली व आम्ही विमानात जाऊन बसायची वाट बघत लॉऊंजमध्ये जाऊन बसलो. आम्ही व्हिसा पण येथूनच काढून घेतला होता, कारण विशेष मुलांबरोबर थायलंडला पोहोचल्यावर आम्हाला काही प्रॉब्लेम नको होते. विमानात बसण्याची घोषणा झाली. एक एक जण विमानात चढू लागले. मला खूप मस्त वाटत होते. चला अनेक अडचणींवर मात करून एकदाचे आम्ही मुलांना घेऊन परदेश वारीला निघालो होतो. वॉ...व!
विमानात बसल्यावर मुले थोडीशी घाबरली होती. अदिती माझ्याजवळच होती. विमाने रनवेवर जोरात धावायला लागल्यावर तिने माझा हात घट्ट धरून ठेवला होता. जसे विमान उंचावर जाऊन स्थिर झाले तसा तिने माझा हात सोडला व ती रिलॅक्स झाली. बऱ्याच मुलांची हीच अवस्था होती. विमानातून खाली दिसणारी दृश्ये बघण्याइतके नंतर रिलॅक्स झाले. प्रवास संपवून आम्ही सुवर्णभूमी या बँकॉकमधल्या भव्य विमानतळावर आलो. खरंच खूप भव्य व सुंदर आहे हा विमानतळ. सामान ताब्यात घेऊन आम्ही बाहेर आलो, तेथे आम्हाला नेणारी बस व आमचा इकडचा ग्रुप लीडर, गाईड आमच्या स्वागताला उभाच होता.
यांच्याबरोबर आमची अद्भुत थायलंड वारी सुरु झाली. आम्ही ‘बँकॉक’ व ‘पटाया’ या दोन शहरांना भेट देणार होतो. बँकॉकहून बसने आम्ही लगेचच पटायाला गेलो. पटायाला जातानाच वाटेमध्ये जेवण घेतले. एका पंजाबी माणसाचेच ते हॉटेल होते. येथे अगदी भारतीय पद्धतीचे जेवण आम्ही घेतले. पटायाच्या समुद्र किनाऱ्यावर असणाऱ्या एका सुंदर हॉटेलमध्ये आमची राहायची सोय होती. एका रुममध्ये तिघेजण असणार होते. एक स्वयंसेवक व दोन मुले असे नियोजन आधीच केले होते. त्याप्रमाणे खोल्यांचे वाटप झाले. नंतर आम्ही ‘अल्काझार’ हा प्रसिद्ध शो बघायला गेलो. या थिएटरवर खूपच गर्दी होती. मुलांना व्यवस्थित सांभाळतच आम्ही आत गेलो. कलाकारांनी दोन तास डान्स व गाण्यांचे जे सादरीकरण केले, ते अद्भुत होते. सगळ्यात धक्कादायक होते ते हे की, सुंदर दिसणारे कलाकार स्त्रिया नसून तृतीयपंथी होते. यांनी स्त्रियांच्या वेशात सर्व डान्सेसचे सादरीकरण अतिशय कलात्मकतेने केले होते. रात्री बाहेरच्या हॉटेलमध्ये जेवूनच आम्ही हॉटेलवर गेलो. सर्वजण दमले होते त्यामुळे लगेच सगळे झोपायला गेले.
सकाळी सर्वजण आवरूनच नाष्ट्याला आले. नाष्ट्यामध्ये ब्रेडचे अनेक प्रकार, केकस्, कॉर्नफ्लेक्स, ऑमलेट, ज्युस व चहा, कॉफी शिवाय इडली सांबारही होते. साधारण अशाच प्रकारचा नाष्टा रोजच होता. आम्ही पटायाच्या समुद्रकिनाऱ्यावर पॅरॅसेलिंग ��ेले. यासाठी किनाऱ्यावरून पाण्यातून चालत जाऊन थोड्या अंतरावर असलेल्या बोटीत बसायचे होते, काही मुलांच्या दृष्टीने हे सुद्धा एक धाडसच होते. ही बोट खोल समुद्रात पॅरॅसेलिंगसाठी, दुसऱ्या बोटीवर घेऊन जाणार होती. बोटीचा हा प्रवाससुद्धा मस्त होता. मुलांनी अलिबाग जवळील नागावच्या समुद्रकिनाऱ्यावर पॅरॅसेलिंग केलेले होते. त्यामुळे त्यांना भीती वाटत नव्हती. पण येथे समुद्रावर जास्त उंचावर नेऊन ते खाली आणत होते. सर्वांनीच पॅरॅसेलिंग केले व धाडसी क्रीडाप्रकारामधील थ्रिल अनुभवले. फक्त अदितीला तेथील माणसाने परवानगी दिली नाही. आम्ही त्याला सांगण्याचा प्रयत्न केला की ही करू शकेल, पण तो ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. अदिती थोडी नाराज झाली, कारण असे धाडसी अनुभव घ्यायला तिला खूप आवडते. पॅरॅसेलिंग झाल्यावर आम्ही बोटीमध्ये बसून मला सर्वात आवडलेला उपक्रम सी वॉकिंग, समुद्र तळाशी चालणे हा उपक्रम करायला गेलो. राज व श्रेयस या दोन मुलांनी सी वॉकिंग केले, याचे मला फार कौतुक वाटले. कारण २२ किलोचा ऑक्सिजन सिलेंडर डोक्यावर घेऊन समुद्राच्या पाण्यामध्ये तळाशी जायचे. तो सिलेंडर डोक्यावर घेताना भीती वाटते व तो घेऊन समुद्राच्या तळाशी जायचे हे सोपे नव्हते. हे मी अनुभवाने सांगते. या दोघांना पोहतापण येत नव्हते. पोहता येत नसेल तर पाण्यात जायची भीती वाटते व इथे तर समुद्राच्या तळाशी जायचे होते. अर्थात, समुद्र तळाशी चालताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची असते ती अशी की पाण्यात पोहायचे नाही तर चालायचे असते, कारण डोक्यावर असलेला ऑक्सिजन सिलेंडर आडवा झाला तर तोंडामध्ये असलेल्या नळीतून ऑक्सिजन पुरवठा कमी होऊन गंभीर प्रसंग येऊ शकतो. इन्स्ट्रक्टरने दिलेल्या सर्व सूचना आम्ही दोघांना समजावून सांगितल्या. एकमेकांचे हात धरून चालणे, समुद्राच्या तळाशी चालायचे, पोहायचा प्रयत्न करायचा नाही म्हणजे पाण्यात आडवे व्हायचे नाही व श्वास घ्यायला काही अडचण वाटली तर हात वर करून इन्स्ट्रक्टरचे लक्ष वेधायचे. या सर्व सूचना समजून त्याप्रमाणे त्यांनी केले. मी त्यांच्या बरोबरच होते. आम्ही एकमेकांचे हात हातात धरूनच चालत होतो. उथळ पाण्यात प्रवाळ (Corals) असतात. आम्ही चालत त्या प्रवाळाच्या वसाहतीपर्यंत गेलो. आम्ही पाण्यात चालत असताना इन्स्ट्रक्टरने माश्यांना घालायला खाऊ दिला. तो दिल्याबरोबर तो खाऊ खायला खूप मासे आमच्या अगदी जवळ आले. इतके रंगीबेरंगी मासे जवळून बघण्याचा अनुभव फारच अफलातून होता. आमच्या या धाडसी अनुभवाची, समुद्रतळाशी चालतानाची सीडी आम्हाला मिळाली. एक अद्भुत व अविस्मरणीय अनुभव आम्ही घेतला होता. राज व श्रेयस या दोघांनी भीतीवर विजय मिळवून हा अनुभव घेतल्यामुळे मला फार बरे वाटत होते. अदिती हा अनुभव घेऊ शकली असती, पण अदितीला Mitral valve stenosis म्हणजे हृदयाची झडप आकुंचित असल्यामुळे तिला हा अनुभव देऊन धोका पत्करू नये, असे मला वाटले.
दुसऱ्या दिवशी नाष्ट�� झाल्यावर नाँगनूच व्हिलेज (Nong Nooch Village) बघायला गेलो. हे खूप मोठे बोटॅनिकल गार्डन आहे. येथे टुरिस्ट लोकांना आकर्षित करणारे अनेक शो आहेत. येथे आम्ही हत्ती पेंटींग करताना व फुटबॉल खेळताना बघितले. थाई कल्चरल शो बघितले. हे बघताना मुलांना फार मजा वाटत होती. हे सगळे शोज बघायला फार गर्दी होती. त्यामुळे आम्हाला मुलांकडे जरा जास्तच लक्ष ठेवावे लागत होते. हे सगळे शोज बघेपर्यंत संध्याकाळ झाली. रात्रीचे जेवण बाहेरच्या रेस्टॉरंटमध्ये घेऊनच आम्ही हॉटेलवर गेलो.
तिसऱ्या दिवशी आम्ही बँकॉक या शहराकडे जायला निघालो. या चार दिवसांत आम्ही अनेक ठिकाणांना भेटी दिल्या. यामध्ये जेम्स गॅलरी बघायला गेलो. तेथे आमचे सरबत देऊन स्वागत झाले. येथे भुयारी ट्रेनमधून नेऊन, पूर्वी हिरे व किमती खडे खाणीतून कसे काढले जात, तसेच आता कृत्रिम पद्धतीने हिरे व किमती खडे कसे बनवले जातात, हे अतिशय मनोरंजकरीत्या सांगतात.
पटाया सोडल्यावर नंतर दोन दिवस आमचा मुक्काम बँकॉक या शहरात असणार होता. या दोन दिवसांत आम्ही ऑर्किड गार्डन बघितले. हे जगातले सर्वात मोठे ऑर्किड गार्डन आहे. गार्डनची मांडणीही फार सुंदर आहे. सर्वांनी येथे भरपूर फोटो काढून घेतले. दोन बौद्ध मोनॅस्ट्रीज बघितल्या. येथे बुद्धाच्या भव्य मूर्ती आहेत. या मोनॅस्ट्रीजच्या परिसरातील अनेक झाडांवर खाचा पाडून त्यामध्ये ऑर्किडस् लावलेली होती. या ऑर्किड्समुळे बाग फारच सुंदर दिसत होती. सफारी गार्डन बघायला गेलो. येथे माकडांचा एक मनोरंजक शो बघितला. मुलांना या माकडचेष्टा बघताना फार मजा आली. डॉल्फिन शोसुद्धा फार मनोरंजक होता. अनेक स��ंदर पक्षी व प्राणी आम्हाला येथे बघायला मिळाले. गाडीमध्ये बसूनच आपल्याला या पार्कमध्ये फिरवतात. बाईयोके टॉवर ही ८५ मजली बिल्डिंग बघितली व अक्षरशः एका मिनिटात आम्ही ८५व्या मजल्यावर गेलो. इतक्या उंचावरून बँकॉक शहराचे दर्शन झाले. जगातल्या या दोन नंबरच्या इमारतीला भेट दिल्यानंतर आम्ही एम.बी.के. मॉलमध्ये खरेदीसाठी गेलो.
हे चार दिवस आम्ही शाकाहारी व मांसाहारी दोन्ही प्रकारचे व मुख्यतः पंजाबी पद्धतीचे जेवण घेतले. आम्हाला थायलंड ट्रिपमध्ये सुंदर भारतीय जेवण मिळाले, कारण येथे भारतीय रेस्टॉरंट खूप आहेत. एक दिवस मात्र आम्ही खास थाई पद्धतीचे जेवण जेवलो.
पाचव्या दिवशी सकाळी नाष्टा झाल्यावर आम्ही हॉटेल सोडले व सुवर्णभूमी या विमानतळाकडे बसने निघालो. या बस प्रवासात मी सगळ्यांचे आभार मानले व प्रत्येकाला आपले अनुभव सांगण्याची विनंती केली. विशेषतः पालकांनी याची डोळा या ट्रिपमध्ये, नवक्षितिजचे सर्वजण मुलांची खूप छान काळजी घेतात, हे बघितले व त्याबद्दल त्यांनी मनापासून कौतुक केले.
या ट्रिपमध्ये अनेक फोटो व व्हिडिओ फिल्मस् काढल्या. मुलां��रोबर असे अनेक सुंदर अनुभव घेऊन आम्ही पुण्याला पोहोचलो. पुण्याला आल्यावर आमच्या या परदेशवारीची माहिती अनेक पेपरांमध्ये छापून आली. साईदत्त टुरिझमने फार व्यवस्थित आमच्या ट्रिपचे नियोजन केले होते. त्यांच्या संवेदनशील सहकार्यामुळेच विशेष मुलांची थायलंडवारी इतकी छान होऊ शकली.
भरतपूर-पक्षांचे नंदनवन –
२०१४च्या फेब्रुवारीमध्ये ७ ते १३ या कालावधीमध्ये आम्ही भरतपूरला भेट दिली व याला पक्ष्यांचे नंदनवन का म्हणतात, याचा नितांत सुंदर अनुभव घेतला. एका वेगळ्याच कारणासाठी ही ट्रिप आमच्या सर्वांच्या कायम स्मरणात राहील. नेहमीप्रमाणे सर्व पूर्वतयारी केली. यावेळी ४९ जणांचा ग्रुप घेऊन आम्ही जाणार होतो. सात दिवसाचा कार्यक्रम ठरवला होता. गेली तीन वर्षे व्यवस्थित रेल्वे बुकिंग करणाऱ्या माणसाकडेच तिकिटे काढायला दिली. वरचेवर त्याच्याशी संपर्क ठेवणे सुरु होतेच. भरतपूर ट्रिपला जायला फक्त आठ दिवस राहिले, तरी आमच्या हातात तिकिटे येईनात. आता मात्र जरा काळजी वाटायला लागली. वायाळसर त्याला सारखे फोन करत होते व ‘तिकिटे घ्यायला कुठे येऊ?’ असे विचारत होते. हा सांगायचा सर तुम्ही नका येऊ माझा माणूस तुम्हाला तिकिटे आणून देईल. असे करता करता ट्रिपला जायला दोन दिवस राहिले तरी हा तिकिटे आणून देईना. आता मात्र फारच झाले. मी त्याला दोन-तीनदा फोन केले. तर मला म्हणतो कसा, ‘मॅडम काळजी करू नका विशेष मुलांकरता हे काम आहे, मी नक्की तिकिटे देतो.’ जायच्या आदल्या दिवशी त्याने तिकिटे घ्यायला एके ठिकाणी बोलावले. आमच्यातील एकजण तिकिटे आणायला निम्म्या वाटेत गेल्यावर याचा फोन की तू परत जा. मीच तिकिटे घेऊन येतोय. हे होईपर्यंत संध्याकाळ झाली मी घरी गेले. सर्वांच्या बॅगा भरुन तयार होत्या पण तिकिटांचा पत्ताच नव्हता. याला पैसे दिलेले असल्यामुळे दुसरे पर्याय पण बंद झाले होते.
दुसऱ्या दिवशी सकाळी वायाळसरांचा फोन आला की, तिकिटे मिळाली नाहीत. आदल्या दिवशी रात्री तो तिकिटे घेऊन आलाच नाही व सर सारखा फोन लावत होते तर फोन बंद आहे, असे येत होते. आम्हाला काय करावे सुचत नव्हते. दुपारची ट्रेन असल्यामुळे मी व अदिती घरूनच रेल्वे स्टेशनला जाणार होतो. साधारणपणे सकाळी ११.३० वाजता मला सरांचा फोन आला की हा एजंट माझ्याशी फोनवर बोलणार आहे. सरांशी तो काहीच बोलायला तयार नव्हता. मी याच्या फोनची वाटच बघत होते. एवढ्यात फोन वाजला व या माणसाने मला सांगितले, ‘मॅडम, विमानाची तिकिटे काढून मुलांना न्या कारण तिकिटे मिळाली नाहीत.’ तो त्याची शंभर कारणे मला देत होता. मी ते ऐकायच्या मनःस्थितीतच नव्हते, कारण माझ्या डोक्यात पुढे काय करता येईल हा विचार सुरु झाला. मी त्याला फारशी रागवायच्याही फंदात पडले नाही. फोन बंद करून ��हिला फोन अॅडव्हेंचर क्लब मेंबर भागवतसरांना लावला. मला ट्रिप कॅन्सल करायची नव्हती व इतक्या आयत्यावेळी विमानाने जायचे हा पर्यायही घ्यायचा नव्हता. आता रेल्वे तिकिटे पण मिळणार नव्हती व आम्ही एक दोन नसून ४९ लोक होतो. भागवतसरांशी पर्यायी व्यवस्था काय करता येईल, याविषयी चर्चा करताना बसची सोय करता येईल असा पर्याय पुढे आला. पण इतक्या आयत्यावेळी बस व ड्रायव्हर मिळणार का? वायाळसरांना आम्ही महिन्याच्या ��्रेकला ज्यांच्याकडून बस घेतो त्यांच्याकडून बसची सोय होते का, हे बघायला सांगितले. आम्हाला आज रात्रीच निघायला हवे होते. कारण पुढची सगळी हॉटेल बुकिंग्ज झालेली होती व त्यांना पूर्ण पैसे देऊन झालेले होते. आम्ही गेलो नसतो तर हे पैसे वाया जाणार होते व मुख्य म्हणजे मुले फार नाराज झाली असती.
माझा वायाळसर व भागवतसरांशी सतत फोन सुरू होता. आम्हाला नेहमी बससेवा देणाऱ्या लोकांकडून बसची व्यवस्था आमच्याकडून होत नाही, असे नक्की झाले. मग आता भागवतसरांना बस व्यवस्था आमच्याकडून होत नाही तर आता तुमच्या ओळखीमधूनच बस ठरवा, असे सांगितले. साधारणपणे चार वाजता एक बस व एक ड्रायव्हर मिळतोय असे झाले. पण लांब जायचे तर बसचे दोन तासांचे काम करून घ्यावे लागेल व तोपर्यंत ड्रायव्हर येईल, असे झाले. हे समजल्यावर मारुंजीला पहिला फोन लावला व आज रात्री बसने निघायचे आहे ही बातमी सांगितली व रात्रीचे सगळ्यांचे जेवण तयार करायला सांगितले. वायाळसरांना पालकांना झालेला प्रकार सांगा व बसने जातोय असा निरोप द्यायला सांगितला. एक-दोन पालकांनी शंका उपस्थित केल्या की, मुले इतके तास बसमध्ये बसतील का? या शंका रास्त होत्या, कारण खूप मोठा पल्ला बसप्रवास करून गाठायचा होता. पुणे ते राजस्थानमधील भरतपूर व येताना आग्रा येथील ताजमहल असा कार्यक्रम होता.
रात्री साडेसात वाजता बस आली. बस नवक्षितिजच्या आवारात शिरताच मुलांनी एकच कल्ला केला. आम्ही सर्वजण जेवून तयारच होतो. भराभर सामान बसमध्ये ठेवले. गणपती बाप्पा मोरयाच्या गजरातच आमचा हा भन्नाट पुणे भरतपूर प्रवास सुरु झाला. एकदाची ट्रिप निघाली यातच सगळे खुश होतो. गाडीमध्ये गाणी सुरूच होती. सध्या आमच्याबरोबर एकच ड्रायव्हर होता. दुसरा ड्रायव्हर आम्हाला अहमदाबादमध्ये मिळणार होता. थोडा प्रवास झाल्यावर एक एक जण निद्रेच्या अधीन होऊ लागले. ड्रायव्हर बरोबर रात्रभर जागे राहाण्यासाठी पुरुष स्वयंसेवकांनी ड्युटीज लावून घेतल्या. रात्री फक्त एकदाच ड्रायव्हरने व आम्ही सर्वांनी बाथरुम ब्रेक घेतला. त्याचवेळी ड्रायव्हरने चहा पिऊन घेतला. सकाळी उजाडताच आम्ही अहमदाबादला पोहोचलो. इथे आम्हाला अजून एक धक्का बसला. दुसरा ड्रायव्हर काही कारणानी आमच्याबरोबर येऊ शकणार नव्हता, म्हणजे आता या एकाच ड्रायव्हरला पूर्ण ड्रायव्हिंग करायचे होते.
आम्ही वाटेतल्या एका हॉटेलमध्ये थांबून सकाळचे प्रातर्विधी व नाष्टा उर��ला. मुले ठीक होती. आता प्रवासामध्ये आमची अंताक्षरी सुरु झाली. काहीजण पत्ते खेळत होते, तर काहीजण झोप घेत होते. दुपारी एका धाब्यावर थांबून आम्ही जेवण घेतले. या धाब्याच्या मालकाने आम्हाला फार प्रेमाने जेवायला घातले व आग्रहाने ताक दिले व त्याचे पैसे घेतले नाहीत. आमचे जेवण होईपर्यंत ड्रायव्हरने दोन तास झोप घेतली. आजही त्याला रात्रभर गाडी चालवायची होती. सकाळी राजस्थानमध्ये प्रवेश केल्यावर जरा बरे वाटले. भरतपूरजवळ आले आहे असे वाटायला लागले. संगमरवर व अनेक रंगाचे दगड असलेले डोंगर दिसू लागले. ज्या रंगाचा दगड जास्त असेल तसे डोंगर पांढ���े, लाल, हिरवट रंगाचे दिसत होते. ७ तारखेला रात्री आठ वाजता पुण्याहून निघालो व ९ तारखेला संध्याकाळी पाच वाजता भरतपुरला पोहोचलो. आम्ही ४५ तास सलग बसप्रवास केला. आमच्या कल्पनेपेक्षा चांगला प्रवास झाला. परत एकदा मुलांनी त्यांची अॅडजस्ट करण्याची कुवत दाखवून दिली. आम्ही एक काळजी नक्की घेतली, मुलांना वेळच्या वेळी खायला दिले व योग्य अंतराने बाथरुम ब्रेक्स घेतले. आमच्याकडे अधेमधे खायला बरेच पदार्थ होते, याचा फायदा झाला. कारण दरवेळी नाष्टा, दुपारचे व रात्रीचे जेवण घ्यायच्या वेळी चांगले हॉटेल व बस थांबायला योग्य जागा मिळत नव्हती. शक्यतो सकाळचा नाष्टा, दुपारचे व रात्रीचे जेवण ताजे व गरमच घेत होतो.
प्रवासामध्ये एक जास्त दिवस गेल्यामुळे, आम्हाला भरतपूरला दोन दिवसांच्या ऐवजी एक दिवसच मिळणार होता. हॉटेलमध्ये ठरल्याप्रमाणे रुम वाटप झाल्यावर सगळ्यांनी पहिल्यांदा आंघोळी उरकल्या व प्रवासाचा शिणवटा काढून टाकला. संध्याकाळी चहा बरोबर चविष्ट सामोसे होते. आज रात्री जेवण करून थोड्याफार गप्पा मारून सगळेच झोपायला गेलो. एवढ्या मोठ्या प्रवासाने खरंतर सगळेच दमलेले होते व कॉटवर मस्त पसरून झोपायची सगळ्यांना घाई झाली होती.
दुसऱ्या दिवशी सकाळी पक्ष्यांच्या नंदनवनात जायचे होते. कसे असेल हे नंदनवन याचा विचार करत असताना झोप लागून गेली. सकाळी आमचा नाष्टा होईपर्यंत सायकलरिक्षा आम्हाला भरतपूरच्या जंगलात नेण्यासाठी आलेल्याच होत्या. प्रत्येक सायकल रिक्षामध्ये तिघेजण बसलो. जंगल हॉटेलपासून अगदीच जवळ होते. जंगलात जाण्याआधी काही फॉर्मालिटीज होत्या त्या पूर्ण करून आम्ही जंगलात प्रवेश केला. आमच्याबरोबरचे रिक्षा ड्रायव्हरच आमचे गाईड होते. त्यांना जंगलाची व पक्ष्यांची खूप माहिती होती. एक दुर्बिणही आम्ही बरोबर नेली होती. जंगलात प्रवेश केल्यावर प्रथम अनपेक्षितपणे आम्हाला एक हरणांचा कळप दिसला. हरणे निसर्गामध्ये मनसोक्त बागडताना पाहून, खूप छान वाटत होते. नंतर आम्हाला इतक्या प्रकारचे पक्षी दिसले की, अगदी डोळ्यांचे पारणे फिटले. अनेक प्रकारची, अनेक रंगाची बदके, पोपट, घुबडे, बगळे, चिमण्या, किंग��िशर बघितले.
भारतीय हॉर्नबील, ईगलचे अनेक प्रकार, बॅबलर, बुलबुल, क्वेलस्, बी ईटर, केनस्, पेल्किनस्, गीज. दुसऱ्या देशातील असंख्य पक्षी येथे या काळात वास्तव्याला असतात. फेब्रुवारी मध्यास परत ते आपआपल्या देशात जायला निघतात. सैबेरिया, चायना, युरोप अशा अनेक देशांतून व भारतातील हिमालयाकडील पक्षी येथे येतात. येथील पक्षी खूप माणसाळलेले आहेत. ते अगदी आमच्याजवळ येत होते. अनेक पक्ष्यांची घरटी बघितली. येथे पक्ष्यांसाठी अनेक जलाशये तयार केली आहेत. या जलाशयांमध्ये असलेल्या छोट्या बेटांवर काही पक्षी खूप संख्येने एकत्र बसलेले दिसत होते. त्याबद्दल चौकशी करताना कळले की, आता तीन चार दिवसांत ते मायदेशी जायला निघतील. त्याआधी त्यांच्या अशा मीटिंगज् असतात. अशा मीटिंग्ज सुरू झाल्या की समजावे, आता पक्ष्यांची परत जायची वेळ झाली. कसा त्यांचा संवाद होत असेल? हे मोठे कोडेच आहे. मला वाटते निसर्गातील काही कोडी तशीच राहू द्यावीत, कारण आपण माणसे फार उत्सुकतेपोटी निसर्गाचे संतुलन बिघडवत चाललोय. निसर्गामधील काही गोष्टी अनाकलनीय ठेवण्यातच मजा असते.
दुपारी आम्ही बरोबरच आणलेले जेवण जेवत असताना अक्षरशः आमच्या भोवती पक्ष्यांनी फेर धरला. क्षणभर असे वाटून गेले स्वर्ग यापेक्षा काही वेगळा असेल का? अगदी स्वप्नवत वाटत होते. इतके जवळून पक्षी बघताना फार मजा येत होती. मुले तर एकदम खुश होऊन गेली. जेवण झाल्यावर आम्ही प्रसिद्ध पक्षीतज्ज्ञ सलीम अली यांचे संग्रहालय बघायला गेलो. तेथे पक्ष्यांवरची एक सुंदर फिल्म व अनेक फोटो बघितले. सायकलरिक्षा जरा लांब उभ्या होत्या म्हणून आम्ही पायी चाललो होतो. एवढ्यात एकाला अजगर दिसला. काहीतरी खाऊन सुस्त पडला होता. नंतर रिक्षावाल्यांनी आम्हाला एका पायवाटेपाशी सोडले व एक तासात परत या असे सांगितले. मग काय आम्ही मस्त जंगलात फिरलो. दुर्बिणीतून दूरवर दिसणारे पक्षी मुलांना दाखवले. बदकांचा पाण्यातील विहार मनसोक्त बघितला. मोर व लांडोर यांचा मुक्त विहार बघितला. एका ढोलीमध्ये बसलेली पोपटाची जोडी बघितली. घरट्यावर बसलेले घुबड, आपल्या पिलाला घरट्यामध्ये घास भरवताना गिधाड अशी अनेक सुंदर दृश्ये बघितली. नाव माहिती नसलेले अनेक सुंदर पक्षी बघितले. नावात काय आहे? त्या पक्ष्यांनी त्यांच्या दर्शनाने आम्हाला खूप अविस्मरणीय अनुभव दिला. त्यांना बघून आम्ही तृप्त मनाने परतीच्या वाटेला लागलो. आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त प्रकारचे व सुंदर पक्षी आम्हाला दिसले.
दुसऱ्या दिवशी पहाटेच सर्वजण उठलो. बॅग्ज बऱ्यापैकी रात्रीच आवरून ठेवलेल्या होत्या. सकाळी चहा-नाष्टा करून आम्ही सर्वजण बस��ध्ये बसलो. आजचे दुपारचे जेवण आम्ही या हॉटेलवाल्याकडूनच बनवून घेतले होते. प्रवासामध्ये चांगले सावलीचे ठिकाण बघून बस थांबवायची व जेवण घ्यायचे असे आम्ही ठरवले होते.
आज ड्रायव्हर अगदी फ्रेश दिसत होते. त्यांना चांगली विश्रांती मिळाली होती. परत एकदा गणपती बाप्पा मोरयाच्या गजरातच ड्रायव्हरने गाडी सुरु केली. ११ तारखेला सकाळी सात वाजता आम्ही परतीचा प्रवास सुरु केला. आज आम्ही जगातील सात आश्चर्यांपैकी एक ‘ताजमहाल’ बघायला आग्रा या शहराकडे निघालो. भरतपूर-आग्रा अंतर फार नाही. अर्थात, आमच्या अंतराच्या व्याख्या आता बदलल्या होत्या. आम्ही साधारणपणे ११ वाजता आग्रा येथे पोहोचलो. गाडी एका ठिकाणी लावून आम्ही चालत ताजमहाल बघायला गेलो. येथे खूपच गर्दी होती. मुलांच्या भोवती कडे करूनच आम्ही ताजमहालाच्या दिशेने जात होतो. ताजमहालाच्या प्रवेशद्वारातून आत पाऊल टाकताच संगमरवरामध्ये बांधलेले हे आश्चर्य बघून धन्य झालो. धन्य तो बादशहा, त्याचे प्रेम आणि धन्य ते कारागीर. इथे भरपूर फोटो काढून आम्ही बसमध्ये बसायला गेलो. अशा गर्दीच्या ठिकाणी मुलांना घेऊन थांबणे फारसे सुरक्षित वाटत नाही. कारण जर एखादे मूल रस्ता चुकले, तर नीट पत्ता पण सांगू शकणार नाही. मुलांना पण गर्दीमध्ये फारसे आवडत नाही, ते अवघडल्यासारखेच असतात. म्हणून विशेष मुले बरोबर असताना गर्दीची ठिकाणे शक्यतो टाळलेलीच बरी, असे वाटते. ताजमहाल बघून झाल्यावर आम्ही शहराच्या बाहेर आलो व छान सावलीची जागा बघून बस थांबवली व जेवण केले. बस बरोबर असल्याचा एक फायदा होता, आम्ही कुठेही थांबू शकत होतो. आता खरा परतीचा प्रवास सुरु झाला. मजल दरमजल करत आम्ही १३ तारखेला सकाळी अकरा वाजता मारुंजी इथे पोहोचलो. आमच्या स्वागताला काही पालक व नवक्षितिजचे सहकारी होते. त्यांनी पेढे देऊन आमचे स्वागत केले.
अशा तऱ्हेने आमची आगळीवेगळी भरतपूर ट्रिप यशस्वी झाली. अगदी आयत्यावेळी आलेले संकट आम्ही संघ भावनेने परतवून लावले होते. सगळ्यात जास्त कौतुक मुलांचे. एवढा मोठा ३४०० किलोमीटरचा प्रवास त्यांनी काहीही त्रास न देता व मुख्य म्हणजे आनंद घेत पूर्ण केला. विशेष मुले आपल्याला वाटतात त्यापेक्षा खूप सहनशील व सहकार्य देणारी असतात. आपण त्यांना कसे समजावतो व प्रोत्साहित करतो, यावर सर्व अवलंबून असते.
काही पालक म्हणाले, ‘मॅडम ट्रिपवरून आल्यावर मुले खूप खुश आहेत. दरवर्षी बसनेच जात जा, कारण ट्रेनची तिकिटे मिळायला किती त्रास होतो.’ एक पालक म्हणाले, ‘मॅडम तुम्ही स्कूटरवर नेले असते तरी मुले आली असती व आम्ही त्यांना पाठवले असते.’ यातील गमतीचा भाग सोडला, तरी पालकांनी एवढा विश्वास दाखवल्यामु���ेच आम्हाला एवढ्या अडचणींवर म���त करून भरतपूरला, पक्ष्यांच्या नंदनवनात मुलांना नेल्याचे अतीव समाधान मिळाले.
https://navkshitij.org/19-Itara-tripsa
0 notes
inshortsmarathi · 5 years ago
Text
World cup 2019: सेमी फायनलच्या वेळी पाऊस पडला तर 'ही' टीम जाणार फायनलमध्ये
World cup 2019: सेमी फायनलच्या वेळी पाऊस पडला तर ‘ही’ टीम जाणार फायनलमध्ये
२०१९ क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये पहिली फायनल टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. पण या मॅचवर पावसाचं सावट आहे. त्यामुळे सामना रद्द झाला तर कोणती टीम फायनलला पोहोचणार, असा सवाल क्रिकेट रसिकांना पडला असेल.
सेमी फायनलच्या वेळी इंग्लंडमधल्या हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तवली आहे. पण आयसीसीने सेमी फायनल आणि फायनल मॅचसाठी राखीव दिवस ठेवले आहेत. त्यामुळे पहिल्या दिवशी मॅच होऊ शकली नाही, तर…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 24 November 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ नोव्हेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी ११ वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा ११६ वा भाग होता. मन की बात मध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आजचा दिवस विशेष आहे. आज राष्ट्रीय छात्र सेना अर्थात एनसीसी दिवस आहे. एनसीसीचा विषय निघाल्यानंतर शाळा-महाविद्यालयातील दिवस आठवतात. मी स्‍वःत एनसीसीचा कॅडेट राहिलेलो आहे. त्‍यातुन मिळालेला अनुभव अमूल्य आहे. एनसीसी तरुण-तरुणींमध्ये शिस्त, नेतृत्व आणि सेवेची भावना रुजवते. देशात कोणतीही आपत्ती आल्यानंतर एनसीसीचे कॅडेट्‍स मदतीला धाऊन जातात. एनसीसीमध्ये मुलींचं प्रमाण ४�� टक्‍क्यांवर पोहचले असून, देशात एनसीसीला मजबूत करण्यासाठी सातत्याने काम होत असल्याचंही पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं.
विकसित भारत घडवण्यात युवावर्गाची भूमिका खूप मोठी आणि महत्वाची आहे. १२ जानेवारीला स्वामी विवेकानंदांची १६२ वी जयंती आहे. त्यावेळी ही जयंती, विशेष प्रकारे साजरी केली जाणार आहे. यानिमित्तानं ११-१२ जानेवारी रोजी दिल्लीतील भारत मंडपम इथं युवा विचारांचा महामेळावा होणार असून, 'विकसित भारत युवा नेते संवाद' असं या उपक्रमाचं नाव आहे. भारतभरातून कोट्यवधी तरुण-तरुणी यात सहभागी होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
आजकाल मुलांच्या शिक्षणाबाबत अनेक प्रकारचे प्रयोग केले जात आहेत. आपल्या मुलांमध्ये सृजनशीलता वाढावी आणि पुस्तकांबद्दलचं प्रेम आणखी वाढवणं गरजेचं आहे. चेन्नईत मुलांसाठी एक वाचनालय तयार केलं आहे, जे सर्जनशीलता आणि शिकण्याचं केंद्र बनलं आहे. हैदराबादमध्येही ‘फूड फॉर थॉट’ फाऊंडेशननं अनेक अनोखी ग्रंथालये निर्माण केली आहेत. बिहारमध्ये गोपालगंजच्या ‘प्रयोग लायब्ररी’ या ग्रंथालयाची चर्चा तर आसपासच्या अनेक शहरांमध्ये होऊ लागल्याचं मोदी सांगितलं.
 ओमानमध्ये भारतीय दूतावास आणि भारतीय राष्ट्रीय अभिलेखागार यांच्या संयुक्त विद्यमाने एका पथकानं, भारतीय असलेल्या कुटुंबांचा इतिहास जतन करण्याचे काम सुरू केले आहे.  या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत, हजारो कागदपत्रे जमा केली आहेत. जो देश, जे स्थान, आपला इतिहास जपतात, त्यांचे भविष्यही सुरक्षित राहते. हाच विचार करून गावांचा इतिहास जतन करण्यासाठी एक डिरेक्टरी-निर्देशिका तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं.
चेन्नईच्या कूदुगल ट्रस्टने चिमण्यांची संख्या वाढवण्याच्या मोहिम शाळकरी मुलांना सामावून घेतले आहे. संस्थेतील लोक शाळांमध्ये जाऊन मुलांना चिमणीचे दैनंदिन जीवनात किती महत्त्व आहे हे समजावून सांगतात. या संस्था मुलांना चिमण्यांची घरटी बनवण्याचे प्र��िक्षण देतात. यासाठी संस्थेतील लोकांनी लहान मुलांना लाकडी घरटी बनवायला शिकवले. गेल्या चार वर्षांत संस्थेने चिमण्यांसाठी अशी दहा हजार घरटी तयार केली आहेत.
'सरकारी कार्यालय' असं कोणी म्हटल्याबरोबर फायलींच्या ढिगाऱ्याचे चित्र तुमच्या डोळ्यासमोर येत असेल. वर्षानुवर्षे या फायली कार्यालयात पडून होत्या, धुळीनं भरल्या होत्या, तेथे घाण होऊ लागली होती. अनेक दशके पडून असलेल्या जुन्या फायली आणि भंगार काढण्यासाठी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आल्याचंही पंतप्रधानांनी सांगितलं. याशिवाय इतरही अनेक विषयांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मधून माहिती दिली आहे.
****
कायद्याचं शिक्षण घेणा-यांसाठी ‘विधी विधान सेवावृत्ती अर्थात इंटर्नशिप’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
२० जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२५ दरम्यान हा उपक्रम राबवला जाणार आहे.राज्यातील विधी महाविद्यालयं-विद्यापीठातील पदवी -पदव्युत्तर पदवीचे विद्यार्थी यासाठी पात्र आहेत. यासाठी internship.aicte-india.org या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करता येईल.
कायदेशीर प्रस्ताव तपासणी  प्रक्रिया, विधेयक-अध्यादेश मसुदा तसंच दुय्यम विधी विधान निर्मिती आणि संविधानातील कायदेविषयक तरतुदींचा प्रत्यक्ष वापर याबाबत यातुन प्रशिक्षण प्राप्त होणार आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात उद्या पशुगणनेला सुरुवात  होत आहे. २१ व्या पंचवार्षिक पशुगणने अंतर्गत विविध प्रजाती, लिंग -वयनिहाय ही गणना केली जाणार आहे. यासाठी नियुक्त प्रगणकांना नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयातर्फे करण्यात आलं आहे.
****
बॉर्डर-गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेत पहिल्या सामन्याच्या आज तिस-या दिवशी; ताज्या वृत्तानुसार दुस-या सत्रात ,भारतानं आपल्या दुस-या डावांत पाच बाद ३२६ धावा करत ३७२ धावांची आघाडी घेतली आहे.
****
0 notes
loksutra · 3 years ago
Text
लसिथ मलिंगाने 4 चेंडूत 4 विकेट घेतल्या, तो झाला इतिहास, दक्षिण आफ्रिकेला विश्वचषकात 4 धावा करायच्या होत्या; पहा व्हिडिओ - लसिथ मलिंगाने 4 चेंडूत 4 विकेट घेत इतिहास रचला, दक्षिण आफ्रिकेला 4 धावा करताना घाम फुटला; व्हिडिओ पहा
लसिथ मलिंगाने 4 चेंडूत 4 विकेट घेतल्या, तो झाला इतिहास, दक्षिण आफ्रिकेला विश्वचषकात 4 धावा करायच्या होत्या; पहा व्हिडिओ – लसिथ मलिंगाने 4 चेंडूत 4 विकेट घेत इतिहास रचला, दक्षिण आफ्रिकेला 4 धावा करताना घाम फुटला; व्हिडिओ पहा
2007 मध्ये, 28 मार्च रोजी, श्रीलंकेचा गोलंदाज लसिथ मलिंगा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4 चेंडूत 4 बळी घेणारा जगातील पहिला गोलंदाज ठरला. लसिथ मलिंगाने आयसीसी क्रिकेट विश्वचषकाच्या २६व्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेवि��ुद्ध ही कामगिरी केली. जॉर्जटाऊनच्या प्रॉव्हिडन्स स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. त्या सामन्यात ‘यॉर्कर किंग’च्या किलर बॉलिंगमुळे विजयाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या दक्षिण आफ्रिकेला अवघ्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
Asia Cup 2022 : प्रमुख फलंदाजांच्या अपयशाची भारतीय संघाला चिंता
Asia Cup 2022 : प्रमुख फलंदाजांच्या अपयशाची भारतीय संघाला चिंता
Asia Cup 2022 : प्रमुख फलंदाजांच्या अपयशाची भारतीय संघाला चिंता दुबई – नियमित कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली व लोकेश राहुल हे प्रमुख फलंदाज आशिया करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघात परतले असले तरीही त्यांच्या सुमार कामगिरीचीच चिंता निर्माण झाली आहे. या स्पर्धेला येत्या शनिवारपासून प्रारंभ होत असून दुसऱ्याच दिवशी रविवारी भारताचा सलामीचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होत आहे.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
aptedhruv21 · 6 years ago
Text
मला काय त्याचे..
आपल्याला सतत कशाचे ना कशाचे डोहाळे लागत असतात. हिंदुत्वाचे, राष्ट्रियत्वाचे, सणांचे, New Year आणि Christmasचे, क्रिकेटचे, राजकारणाचे... इथपासून सुरु होऊन... WhatsApp मुळे अगदी सोमवार/गुरुवारपासून संकष्टी चतुर्थीपर्यंत सगळे सगळे डोहाळे लागतात.अशाच एका डोहाळ्याचं आज उद्यापन आहे.
अगदी बरोबर..
गेल्या पंधरवड्यापासून Pregnant असलेल्या देशभक्तीची आज झेंडावंदन झालं की Delivery होईल.. आणि मग आपण नवीन Pregnancy साठी मोकळे होऊ..
आणि यावेळचा प्रजासत्ताक दिन तर अजूनच खास आहे... काही दिवसांपूर्वीच 'उरी' चित्र���टाची फोडणी बसली आहे.. काल लागलेले मणिकर्णिका आणि ठाकरे Supplement म्हणून आहेतच. पण तरी नेमका long weekend चुकलाच.
नाहीतर अगदी मजा आली असती बघा.. 
त्यात भर म्हणून प्रत्येक गोष्टीचा Events करणारे आहेतच. कालच एक Flex बघितला, Come with your School Buddies on this Republic Day and get free beers for entire group. वाचूनच चाट पडलो..
काही दिवसांनी पितृपक्षाचाही Event झाला, तर नवल वाटून घेऊ नका..
मग आता तुम्ही म्हणाल की जे पाजतायत त्यांना Problem नाही... जे पितायत त्यांना Problem नाही.. मग मधल्या मधे माझं नाटक काय आहे! 
तुम्ही जर खरंच बारकाईने लक्ष दिलंत... तर या Attitude मुळे आपल्याला एक रोग जडतोय... स्वातंत्र्यवीर सावरकरांनी खुप आधीच या रोगाचं निदान करुन ठेवलंय.. त्या रोगाचं नाव आहे,
'मला काय त्याचं!'
झेंडावंदन झालं... प्लास्टिकचे झेंडे फडकवले.. दुसऱ्या दिवशी त्याचाच कचरा झाला... पण मला काय त्याचं...
झेंडावंदन झालं... एक गाडी कमी पडली म्हणून ट्रिपल सीट निघालो... चौकात पोलीस शिट्ट्या मारुन थांबवतोय.. पण मला काय त्याचं...
टपरीवर चहा पित उभे आहात... शेजारी एक भाई हवेत धूर सोडत उभा आहे... तिथल्याच एका वयस्कर बाईला त्याचा त्रास होतोय.. पण मला काय त्याचं..
समोरुन पुण्यात नवीन आलेल्या माणसाची रिक्षावाला अडवणूक करतोय... स्टेशन ते शिवाजीनगर १५०₹ सांगतोय... पण मला काय त्याचं...
Friday Night... मस्त दारु पिऊन झिंगतोय... तिकडे आई- बाप मुलगा सरळ- सभ्य आहे या समजुतीत निवांत... पण मला काय त्याचं...
चौकात एक मुलगा रोज येऊन माझ्याच Colleague ची छेड काढतो.. ती बिचारी तोंडाने बोलत नाही, डोळ्यातून बरंच काही सांगून जाते.. पण मला काय त्याचं...
या सगळ्या गोष्टींमध्ये आमची देशभक्ती वांझ होऊन जाते..
आता या सगळ्या गोष्टींचा आणि देशभक्तीचा काय संबंध?
थांबा.. सांगतो...
स्वातंत्र्यापूर्वीची गोष्ट आहे.. सशस्त्र लढ्याला म्हणावं तेवढं यश मिळत नव्हतं.. टिळकांच्या निधनानंतर नेतृत्व हरपलं.. जवळ जवळ सर्व क्रांतीकारक भूमिगत होते.. सावरकर लंडनमध्ये होते... मग एक अभिनव लढा भारतात उभा राहिला... त्यामध्ये फाशी जाण्याची गरज नव्हती... काळ्या पाण्याची भिती नव्हती.. कुटुंबांवर जुलूम होणार नव्हता...
मग नक्की काय करायचं होतं?
काहींनी झाडाला मिठी मारायची होती... काहींनी मीठ उचलायचं होतं... काहींनी विदेशी कापडाची होळी करायची होती... काहींना पोलीस ठाण्यावर मोर्चे काढायचे होते... 
काही मूठभर क्रांतीकारकांनी संपूर्ण त्याग करण्यापेक्षा, बहुतांश जनतेने थोडा थोडा त्याग करायचा होता.. त्यावेळी कोणाच्या डोक्यात हा विचार आला नाही की, मला काय त्याचं! 
आणि आला असता, तर मग काही खरं नव्हतं बरं का...
आपल्या देशभक्तीच्या कल्पनाच निराळ्या असतात मित्रांनो... बाॅर्डर आणि गदरमधले नायक, भगतसिंग आणि अगदी कालच्या उरीमधला विहान शेरगील... ही माणसं आणि त्यांचा त्याग फार अवघड आहे... आपल्यासारख्या सामान्य माणसाला तो सहसा झेपत नाही...
म्हणून मग आम्ही काय करतो, मला काय त्याचं म्हणत गप्प बसतो...
अरे, नो एंट्रीतून आलेल्याला घाल की गाडी आडवी एकदा... चार गोष्टी सुनव त्याला... समजवून सांग... हा तुझाच रस्ता आहे... हा तुझाच देश आहे...
समोरचा माणूस कचरा टाकतोय.. तू बघतोयस... त्याला उलटं बोलायचं धाडस होत नाहीए... मग एकदा स्वतःहून तो कचरा उचलून तर बघ... अरे मित्रा, हा तुझाच कोपरा आहे... हा तुझाच देश आहे...
नारायण पेठेतल्या हाॅटेलात गेलायस... समोरचा माणूस पुणेकर आहे, हे ठाऊक आहे तुला... तरीही हिंदीमधून संवाद साधतोयस... मित्रा घडा घडा मराठीतून बोल की... ही तुझीच भाषा आहे रे.. हा तुझाच देश आहे...
क्रिकेट खेळतोस.. क्रिकेट बघतोस... गर्दीनं स्टेडियम भरुन टाकतोस... तिकडे हाॅकीवाले प्रेक्षकांची वाट बघतात... कधीतरी पाऊल हाॅकीकडेही टाकून बघ... लेका हा तुझाच खेळ आहे.. हा तुझाच देश आहे..
Office मधला colleague रोज एका मुलीकडे बघत बसतो... तिला आवडत नसताना तिच्यामागे फिरत राहतो.. तुला ते जाणवतं ना? मग घे की बाजूला त्याला एकदा... चांगला सज्जड दम भर... कारण दोस्ता, ही तुझीच बहिण आहे...  हा तुझाच देश आहे...
तुच जर का, सगळं सोडून मला काय त्याचं म्हणत बसलास... तर या देशाने बघायचं कोणाकडे?
Sacred Games मधला एक संवाद खुप वेळा आठवतो.. सिस्टम, मुंबई, कचरा या सगळ्यावर बोलताना सरताज म्हणतो,
"ये सिस्टीम.. ये बम्बई.. ये इंडिया..ये सब कौन है? हम ही है ना BC.."
खरंय की नाही? 
प्रजासत्ताकचा अर्थ लोकांनी लोकांसाठी चालवलेले लोकांचे राज्य असा असतो की लोकांनी निवडून दिलेल्या लोकांचे राज्य असा, हे आपण जेवढ्या लवकर समजू.. तेवढ्या लवकर आपण एक Matured Democracy म्हणून उदयाला येऊ...
नाहीतर मग ते अमेरिकेतले गोडवे आहेतच.. तिथे स्वच्छता आहे... न्याय आहे... वगैरे वगैरे..
ही अशी गोष्टी आहे, की जी नष्ट झाली असती तर सावरकरांना आनंदच झाला असता... पण आपण जसजसे प्रगत होतोय तसतसे अजूनच या गोष्टीला बळी पडतोय...
मणिकर्णिका मधल्या एका गाण्याचे बोल खुप सुंदर आहेत..
' मेरी नस नस तार करलो.. और बनाओ एक सितार...
 राग भारत उसपें छेडो... छनछनाओ बार बार..'
किती परमोच्च त्याग आणि देशप्रेम आहे... आपल्या माहित असतं की हे सगळं आपल्या आवाक्याबाहेर आहे... म्हणून मग आपण फेबुवर पोस्ट टाकतो.. इन्स्टावर स्टोरी टाकतो आणि गप्प बसतो...
तुला नाही ना असलं काही जमत... तरीही तू देशभक्त आहेस हे लक्षात ठेव...
सिग्नल पाळ... तू देशभक्त...
मतदान कर... तू देशभक्त..
लाच देऊ नकोस.. तू देशभक्त...
स्त्रियांचा सन्मान कर... तू देशभक्त..
आणि सगळ्यात महत्त्वाचं,
मला काय त्याचं म्हणणं सोड.. म्हणेजच तू देशभक्त..
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
टीम डेव्हिड ऑस्ट्रेलियाच्या T20I मालिकेपूर्वी भारत विरुद्ध पॉवर हिटिंगचा सराव करत आहे. पहा | क्रिकेट बातम्या
टीम डेव्हिड ऑस्ट्रेलियाच्या T20I मालिकेपूर्वी भारत विरुद्ध पॉवर हिटिंगचा सराव करत आहे. पहा | क्रिकेट बातम्या
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया: टीम डेव्हिड पहिल्या T20I मध्ये ऑस्ट्रेलियात पदार्पण करण्याची शक्यता आहे. मोहाली येथे मंगळवारपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया तीन सामन्यांच्या T20I मालिकेसाठी आमने-सामने येणार आहेत. दोन्ही संघांचे खेळाडू या स्पर्धेसाठी सज्ज झाले आहेत. सर्वांच्या मध्ये, टिम डेव्हिड संधी मिळाल्यास सामन्याच्या दिवशी भारतीय गोलंदाजांचा सामना करण्यासाठी जोरदार तयारी करत आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nitinkandharkar · 3 years ago
Text
सोशल अँझायटी...
पब्लिकसमोर स्टेजवरून बोलतांना किंवा काही परफॉर्म करतांना घाबरं होणे, हातपाय गळणे, तत-पप होणे, कापरं भरणे असा अनुभव बहुतेकांना येतो. अशावेळी भल्याभल्यांची बोलती बंद होते. डोके गरगरायला लागते, घशाला कोरड पडते, काय बोलावे सुचतच नाही. टिव्हीवरील इंडियन आयडॉल पाहतांना याला ‘सोशल अँझायटी’ या गोड नावाने संबोधतात असे समजले. हा शब्द वापरला की सहानुभूती मिळते, लोक हसत नाहीत. पण दुर्दैवाने आमच्या काळात हा शब्द अस्तित्वात नव्हता!
भारत विद्यालयात मी सातवीत असतांना पहिल्यांदा शाळेत स्नेहसम्मेलन भरवण्यात आले होते. छ. शिवाजी कॉलेजचे स्नेहसम्मेलन पहायचो त्यामुळे शाळेतल्या स्नेहसम्मेलनाची खूपच उत्सुकता होती. वेगवेगळे कार्यक्रम ठरवण्यात आले होते. वर्गात गुरूजींनी नोटीस वाचून दाखवली व कुणा कुणाला भाग घ्यायचे त्यांनी नावे द्यावीत असे सुचवले. अंगात नवा हुरूप संचारला होता. एकही इव्हेंट सोडायचा नाही हे ठरवले आणि गुरूजींकडे नाव दिले.
एक दिवस गुरूजींनी अचानक गायनात भाग घेणार्‍यांची चाचणी घेतली. हा क्षण येईपर्यंत रोज वर्गात गॅप मिळाला की गाणी गाने, एखाद्या पिक्चरचे डायलॉग म्हणणे, नाच करणे, अ‍ॅक्टींग करणे असे अनेक प्रकार चालू होते. कधी एकदा स्नेहसम्मेलन येईल अन आपण स्टेजवर जाऊन परफॉर्म करू असे झाले होते. पण चाचणी सुरू झाली तसे अंगातले अवसान गळून पडले. वर्गातील मुले उभे राहुन ऑडिशन देवू लागली. जसे जसे एकेक नंबर पुढे सरकू लागले तसा अजूनच गर्भगळीत होवून गेलो. थंडीचे दिवस असूनही घाम फुटला. माझा नंबर यायच्या आत टोल वाजावा अशी प्रार्थना करत बसलो. पण देवाने ऐकले नाही. माझा नंबर आला अन गुरूजींनी मला उठवले. तोंडातून शब्दच फुटेना. एरवी गाणी, वादन, ऑर्केस्ट्रा याचे लहानपणापासून फारच आकर्षण होते. पण प्रत्यक्ष वेळ आली तेव्हा वाचाच बसली. खिडकीजवळ बसलो होतो. उठून वेड्यासारखा बाहेर बघत ‘सुहाना सफर और ये मौसम हंसी...’ ही ओळ कशीबशी म्हटली. माझे शब्द मलाच ऐकू येत नव्हते. कानठळ्याच बसल्या होत्या. काय गुणगुणलो तेच कळेना. संपूर्ण रामायण चित्रपटाप्रमाणे धरती फाटावी अन आपण आत जावे असेच वाटत होते त्या क्षणी. पुढची ओळ म्हणायच्या आधीच ‘बस खाली’ असा आवाज आला अन पटकन खाली बसलो. छाती धडधड करत होती. डोळ्याच्या कोपर्‍यातून आजूबाजूला पाहिले तेव्हा काही मुले खाली मान घालून हसत होती.
असेच एकदा गुरूजींनी वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायला लावले. मी हादरूनच गेलो. ‘तुझा लहान भाऊ बघ, किती छान भाषण करतो. तुला न करायला काय झाले?’ असे म्हणून गुरूजींनी बळेच मला हरभर्‍याच्या झाडावर चढवले. स्पर्धेच्या दिवशी माझ्या आधी जो मुलगा होता तो सुरूवातीला म्हणाला ‘आज आपण इथे का जमलो आहोत हे आपणा सर्वांना महितच आहे. तरी मी सांगतो की आज लोकमान्य टिळक जयंती आहे’. त्याचे हावभाव पाहुन अख्खा सभागृह (व्हरांडा) हसायला लागला. ते बघून माझेही अवसान गळाले. मागच्या मागे पळून जावे वाटत होते, पण गुरूजींच्या नजरेच्या पट्ट्यात बसलो होतो. सुटका नव्हती!
माझा नंबर आला अन माईकसमोर उभा राहिलो. भाषण पाठ करून आलो होतो. खूपदा रिहर्सल केली होती. पण समोर बसलेल्या विद्यार्थी व शिक्षकांना पाहुन सर्व विसरून गेलो. काय बोललो देवालाच माहित. दोन तीन वाक्यानंतर ब्लँक झालो अन ‘एवढे बोलून मी माझे भाषण थांबवतो’ म्हणून जागेवर जाऊन बसलो. स्टेजवरचे पाहुणे अन सर्व मुले खदाखदा हसत टाळ्या वाजवत होती. लाजल्याहुन लाजल्यासारखे झाले होते. कानाच्या पाळ्या गरम झाल्या होत्या. रडवेला चेहरा करून घरी आलो.
ही ‘सोशल अँझायटी’ अंगात भिनलेली असल्यामुळे स्टेजवरच नाही तर खेळातही फजिती ठरल���लीच. एकदा पंचायत समितीच्या मैदानावर उंच सिंगलबारवर दोन हाताने लटकून झोके घेणार्‍या मोठ्या लोकांना पाहिले होते. आपणही तसे करू शकतो असा फाजील आत्मविश्वास निर्माण झाला आणि खांबावर चढून वरच्या आडव्या बारला लटकून झोके घेणे सुरू केले. पण नको त्या उचापत्या केल्यामुळे हाताची ग्रीप सुटली अन समोर घेतलेल्या झोक्याबरोबर हात सुटून उंचावरून धप्पकन पाठीवर आपटलो. असा पडलो की माझे मला कळत होते माझा श्वास बंद झाला आहे. डोळ्यासमोर अंधारी आली होती. त्या धुसर अंधारात आजूबाजूची मुले हसत होती हे तशा अवस्थेतही जाणवले. नाटक करतोय समजून कुणीच उठवायलाही आले नाही. तसाच डोळे मिटून पडून राहिलो. साधारण एक दोन मिनिटानंतर शुद्धीवर आलो, अन परत कधी सिंगलबारच्या वाटेला गेलो नाही!
आठवीत असतांना औरंगाबादला एक रणजी ट्रॉफी क्रिकेट मॅच पाहिली होती. लहान व मोठा भाऊ चांगले खेळायचे. त्यांना टीममध्ये घेत असत. मी मात्र कपडे सांभाळायला असायचो. त्यामुळे खूप कमीपणा वाटायचा. रणजी मॅच पाहिल्यामुळे सर्वांसमोर फुशारक्या मारू लागलो. शाळेच्या ग्राऊंडवर अंशुमन गायकवाड स्टाईल बॅटींग करायला ऐटीत उतरलो. दोन तीन बॉलनंतर एक जोरात बाऊंसर आला अन कानशीलाच्या बाजूला बसला! काहीच झाले नाही असे दाखवायचा केविलवाणा प्रयत्न केला. पण घेरी आली अन बॅट सोडली ती कायमचीच. पुढे क्रिकेटचा अन माझा संबंध फक्त कॉमेंट्री ऐकण्यापुरताच उरला!
अगदी लहानपणी आम्ही तीन भाऊ लहानपणी एकत्र खेळायचो, मस्ती करायचो. दादा (वडील) घरी असले तर मात्र आम्ही चिडीचुप असायचो. एक दिवस आमची मस्ती, दंगा, भांडणे चालू होती. दादा घरी आलेले लक्षातच आले नाही. आरडाओरडा, गोंधळ, धाडधाड पळणे यात आम्ही मग्न होतो. अचानक ‘काय गोंधळ लावलाय...’ असा दादांचा घोगरा आवाज कानात शिरला. मी घाबरून कोठीघरात लपून बसलो. ते दोघे त्यांच्या तावडीत सापडले. ‘फट फ़ट’ असा दोनदा आवाज आला. नंतर ‘कुठाय ते तिसरं...’ असा धडकी भरवणारा आवाज आला अन घाबरून मी खाली मान घालत बाहेर आलो. काही कळायच्या आत कानाखाली जाळ निघाला. डोळ्यासमोर काजवेच चमकले. त्या दोघांनीही मार खाल्ला होता, पण गरज नसतांना स्वत:हुन बाहेर आल्यामुळे मी खाल्लेला मार मात्र चेष्टेचा विषय बनला! आता याला सोशल अँझायटी म्हणावी का बावळटपणा हा संशोधनाचा विषय आहे.
एकदा गुरूजींनी नंदकुमार या मित्राला ‘हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे...’ या ग���ण्याला काही वेगळी चाल लावण्यासाठी बोलावले. संगीताची थोडीफार आवड असल्यामुळे त्याने मला सोबत घेतले. मी नववीत होतो त्यावेळी. शिक्षकांच्या खोलीत पेटी घेऊन तो चाल बसवू लागला. पटकन मला एक चाल सुचली अन मी ती गुणगुणून दाखवली. इतक्या झटपट चाल सुचली म्हणून तो आणि गुरूजी दोघेही खूप खूश झाले. पण जसे तो ती चाल पेटीवर वाजवू लागला तसे त्याच्या काहीतरी लक्षात आले अन तो हळूच म्हणाला "अरे ही चाल तर 'ए दिल मुझे बता दे तू किसपे आ रहा है...’ या गाण्याची आहे." सगळे हसायला लागले. मी हळूच उठून बाहेर निघून गेलो.
भावाचे पाहुन थोडीफार पेटी वाजवता येत होती. त्यामुळे मित्रांमध्ये वासरात लंगडी गाय शहाणी होतो. अकरावीत असतांना एक किर्तनाचा कार्यक्रम कॉलेजच्या स्टेजवर होता. काही कारणाने त्यांचा पेटीवादक आला नव्हता. कुणीतरी सरांना मी पेटी वाजवतो हे सांगितले. मग काय! सरांनी सरळ मला पकडले अन साथ करायला सांगितले. एखाद दुसरे मोडके तोडके गाणे वाजवणे वेगळे अन साथ करणे वेगळे हे सरांना कोण सांगणार! खरेच तिथे गेलो तर आपलं हसं होईल हे माहित होतं. घामेघुम होवून ‘आलोच’ असे म्हणून मागच्या दाराने जे पळून गेलो ते दोन दिवस कॉलेजला गेलोच नाही!
असे भरपूर फजितीचे किस्से आहेत. लहानपणीचेच नाही तर मोठेपणीचेही आहेत. यापूर्वी यातले बरेच लिहिले आहेत, अजूनही पुढे लिहीन आठवण म्हणून. अशा किश्श्यांमुळे आपली फजिती होत असली तरी लोकांना हसू येते ही पण एक मजाच आहे. अन ही मजा सढळ हस्ते वाटण्यातही मजा आहे...
नितीन म. कंधारकर
औरंगाबाद.
0 notes